मुंबई विमातळावर 26 जानेवारीला दहशतवादी हल्ल्याची आयसिसची धमकी

याबाबतचे धमकीपत्र विमानतळाच्या कार्गोच्या शौचालयात सापडल्याने खळबळ उडालीये.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 30, 2017 09:26 AM IST

मुंबई विमातळावर 26 जानेवारीला दहशतवादी हल्ल्याची आयसिसची धमकी

30 नोव्हेंबर : मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 26 जानेवारीला दहशतवादी हल्ला घडवून आणण्याची धमकी आयसिसने दिलीये. याबाबतचे धमकीपत्र विमानतळाच्या कार्गोच्या शौचालयात सापडल्याने खळबळ उडालीये. त्यामुळे सीआयएसएफ परिसराची कसून तपासणी करत असून शहरात हायअलर्ट जारी करण्यात आलाय.

बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास हे पत्र कार्गो टर्मिनल इमारतीच्या शौचालयामध्ये सफाई कर्मचाऱ्यांना सापडले. आयसिस या दहशतवादी संघटनेकडून छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कार्गो टर्मिनलवर येत्या २६ जानेवारी रोजी हल्ला घडवून आणण्याची धमकी या पत्रातून देण्यात आलीये.  त्यामुळे मुंबई पोलीस आणि सी.आय.एस.एफ यांनी मिळून तातडीने कार्गो परिसर रिकामा करून तपास करण्यास  सुरुवात केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2017 09:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...