मुंबईत आणखी एक हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघड, बॉलिवूड अभिनेत्रीसह 2 रशियन मॉडेल ताब्यात

मुंबईत आणखी एक हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघड, बॉलिवूड अभिनेत्रीसह 2 रशियन मॉडेल ताब्यात

या कारवाईत दोन कास्टिंग डायरेक्टर जावेद आणि नावेद याला अटक करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 21 जानेवारी : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी एकापाठोपाठ सेक्स रॅकेटचा पदार्फाश केला आहे. आता आणखी एक हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आलं असून यात 2 पुरूष आणि एका बॉलिवूडच्या अभिनेत्रीसह 2 रशियन तरुणींना अटक करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं मुंबईतील अंधेरी पूर्व येथील इम्पिरियल पॅलेस या थ्री स्टार हॉटेलवर धाड टाकली होती. या कारवाईत तीन तरुणींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन कास्टिंग डायरेक्टर जावेद आणि नावेद याला देखील अटक करण्यात आली आहे. हे दोघे  तरुण  सुंदर दिसणाऱ्या महिलांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम देण्याचं आमिष देत होते. तसंच महिलांना मोठ्या प्रमाणात पैसे देऊन हा व्यापार करण्यात येत होता. या कारवाईमध्ये अटक करण्यात आलेल्या तरुणींना चित्रपट, मालिकांमध्ये  छोटे मोठे रोल देखील देण्यात आले होते.

मात्र, सोमवारी रात्री या तरुणींना थ्री स्टार हॉटेलमध्ये बोलवण्यात आलं होतं. याची माहिती खबऱ्याकडून मिळाल्यानंतर  समाजसेवा शाखेनं सापळा रचला आणि रंगेहाथ जावेद आणि नावेदसह या 3 तरुणींना ताब्यात घेतलं.

याआधीही म्हणजे 4 दिवसांपूर्वी  मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने मागील आठवड्यात एक हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आणलं होतं. पोलिसांनी मुंबईतील अंधेरी पूर्व येथील ड्रॅगन फ्लाय या थ्री स्टार हॉटेलवर धाड टाकून तीन मुलींची सुटका केली. यामध्ये एक हिंदी अभिनेत्री, एक मराठी अभिनेत्री आणि एक अल्पवयीन मुलगी यांची सुटका करण्यात आली.

पोलिसांना याबाबत वेस्टीन हॉटेलमधून टीप मिळाली होती की, प्रिया शर्मा नावाची एक महिला एजंट मुंबईतील उच्चभ्रू हॉटेलमध्ये मुली पुरवण्याचे काम करत आहे. त्यानुसार रात्री उशिरा पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकली. अटक करण्यात आलेल्या प्रिया शर्मा ही कांदिवली पूर्व येथे विनायक नावाची टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनी चालवते, अशी माहिती मिळाली होती. तसंच ती बॉलीवूडमधील अभिनेत्री पुरवण्याचे काम करते.

SEX रॅकेट, दोन बॉलिवूड अभिनेत्रींना अटक

याआधीही समतानगर येथील सीनिअर इन्स्पेक्टर राजूबाबू कसबे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी मध्यरात्री गोरेगाव पूर्वेतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये छापा मारला होता. खबऱ्याद्वारे पोलिसांना या सेक्स रॅकेटबद्दल माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांमधील एका कर्मचाऱ्याने ग्राहक बनून सेक्स रॅकेटमध्ये सामील असलेल्या तरुणीशी संपर्क केला.

त्यानंतर सेक्स रॅकेटसाठी पैसे स्वीकारतानाच पोलिसांनी तरुणीला अटक केली. नंतर ही तरुणी बॉलिवूड अभिनेत्री असल्याचं समोर आलं आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. 'सेक्स रॅकेटप्रकरणी 32 वर्षीय आणि 26 वर्षीय तरुणींना अटक करण्यात आली. तसंच त्यांच्यावर याबाबत गुन्हादेखील नोंदवण्यात आला आहे,' अशी माहिती पोलीस अधिकारी धर्नेंद्र कांबळे यांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणींपैकी एक जण बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या एका स्पर्धकाची गर्लफ्रेंड असल्याचीही माहिती आहे. या प्रकरणात पोलीस आता अधिकचा तपास करत आहेत.

याआधीही समोर आलं बॉलिवूडचं सेक्स रॅकेट कनेक्शन

काही दिवसांपूर्वी सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखालीच बॉलिवूडमधील एका प्रॉडक्शन मॅनेजरला अटक करण्यात आली होती. मुंबईतील जुहू भागात एका 4 स्टार हॉटेलमध्ये रेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोप या व्यक्तीवर केला गेला. झेड लक्झरी रेसिडेन्सी हॉटेलवर पोलिसांनी छापा मारला. पोलिसांनी प्रॉडक्शन मॅनेजर राजेशकुमार लाल याला अटक केली होती. पोलिसांनी मारलेल्या छाप्यात उज्बेकिस्तानच्या दोन मुलींना या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलं होतं. यापूर्वी 23 डिसेंबरला पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अशाच महिलांना ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी सांगितलं की त्यांना या हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली होती.

पोलिसांनी या हॉटेलवर टाकलेल्या छाप्यात झरीना नावाची एका परदेशी महिला राजेशकुमार लाल याच्या मदतीनं बाहेरच्या देशातून सेक्स रॅकेट चालवत होती. ही महिलाच तिथल्या परदेशी महिलांना या हॉटेलमध्ये पाठवते. त्या बदल्यात तिला प्रति ग्राहक 80 हजार रुपये मिळातात. राजेशकुमार लाल हा बॉलिवूडशी संबंधित असल्यानं या घटनेनंतर सगळीकडे मोठी खळबळ उडाली होती.

First published: January 21, 2020, 5:55 PM IST
Tags: mumbai

ताज्या बातम्या