7 महिन्यांनंतर दादर मार्केट पुन्हा जैसे थे, गर्दीचा काळजात धस्स करणारा VIDEO

7 महिन्यांनंतर दादर मार्केट पुन्हा जैसे थे, गर्दीचा काळजात धस्स करणारा VIDEO

नजर जाईल तिथे तोबा गर्दी, दादर मार्केटमधील गर्दीचा काळजात धस्स करणारा VIDEO

  • Share this:

प्रतिनिधी, रमाकांत तिवारी

मुंबई, 12 नोव्हेंबर : दिवाळी या सणाची सुरुवात झाली आहे. आज वसुबारस दिवाळीच्या निमित्तानं मुंबईतील प्रसिद्ध असलेली बाजारपेठ दादरमध्ये तुफान गर्दी पाहायला मिळाली. धक्कादायक बाब म्हणजे लोकांना यावेळी कोरोनाची भीती आहे की नाही प्रश्न व्हिडीओ समोर आल्यानंतर पडला. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कच्या नियमांचा फज्जा उडाल्याचं दादरच्या बाजारपेठेत पाहायला मिळालं.

दिवाळीनिमित्तानं अशा परिस्थितीत लोक मोठ्या संख्येने कपडे, फुलं आणि मिठाई घेण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. सकाळी 6.30 वाजत दादर मार्केटमधील दृश्यं पाहून काळजात धडकी भरेल. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नियमांना पायदळी तुडवत बिनधास्त दादरच्या बाजारपेठेत लोक फिरत आहेत. जिथे नजर जाईल तिथंपर्यंत ही गर्दी आणि गजबज आहे. फुलांपासून ते मिठाईवाल्यापर्यंत लोकांची ही तोबा गर्दी पाहून कोरोना अधिक वेगानं पसरण्याचा धोका आहे.

हे वाचा-राज्यात जानेवारी-फेब्रुवारीत COVID-19च्या दुसऱ्या लाटेची शक्यता

कोरोनाचा संसर्ग आणि रिकव्हरी रेट आता कुठे सावरत असताना ही तुफान गर्दी पाहून पुन्हा एकदा कोरोनाची राज्यात दुसरी लाट येऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की लोकांनी मास्क आणि सॅनिटायझर तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन केल्याचं दिसत नाही. कोरोना बाधित रूग्णांच्या बाबतीत मुंबई अजूनही प्रथम क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत हे दृश्यं अत्यंत भयानक आहे. कोरोनाची भीती संपली का असा प्रश्न हा व्हिडीओ पाहून पडतो आहे.

जानेवारी-फेब्रुवारीदरम्यान कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच आता ही दृश्यं पाहून ऐन सणासुदीलाच कोरोनाचा संसर्ग वेगानं पसरतो का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 12, 2020, 9:19 AM IST

ताज्या बातम्या