राहुल बोसला 2 केळ्यांसाठी मिळालं 400चं बिल, आता अंड्यांसाठी घेतले 1700 रुपये!

अभिनेते राहुल बोस यांना चंदिगडच्या फाइव्ह स्टार हॉटेलने दोन केळ्यांसाठी 400 रुपयांचं बिल दिलं होतं. आणखीही एका हॉटेलमध्ये दोन उकडलेल्या अंड्यांसाठी 1700 रुपयांचं बिल लावण्यात आलं.

News18 Lokmat | Updated On: Aug 12, 2019 07:27 PM IST

राहुल बोसला 2 केळ्यांसाठी मिळालं 400चं बिल, आता अंड्यांसाठी घेतले 1700 रुपये!

मुंबई, 12 ऑगस्ट : अभिनेते राहुल बोस यांना चंदिगडच्या फाइव्ह स्टार हॉटेलने दोन केळ्यांसाठी 400 रुपयांचं बिल दिलं. याबद्द्लचं त्यांचं ट्वीट खूपच गाजलं होतं.राहुल बोस यांनी त्यांच्या ट्वीटला हे बिलही जोडलं होतं.

असं असलं तरी इतकं अचाट बिल लावणारं चंदिगडमधलं जे. डब्लू. मॅरियट हे एकच हॉटेल नाही तर आणखीही एका हॉटेलमध्ये दोन उकडलेल्या अंड्यांसाठी 1700 रुपयांचं बिल लावण्यात आलं. कार्तिक धर नावाच्या एका व्यक्तीने ट्विटरवर हा किस्सा सांगितला आहे.

Loading...

मुंबईच्या फोर सीझन्स या हॉटेलमध्ये त्यांना दोन उकडलेल्या अंड्यांचं हे बिल देण्यात आलं. राहुल बोस यांना ट्विटरवर टॅग करून कार्तिक धर यांनी विचारलं आहे, यासाठी आपण आंदोलन करुया का?

त्यांचे हे ट्वीट 700 पटीने रिट्वीट झालं आणि अनेक लोकांनी शेअर केलं. ही अंडी सोन्याची आहेत का ? असं एका नेटकऱ्याने गंमतीने विचारलं आहे. तसंच या बजेटमध्ये तर या हॉटेलमध्ये वर्षभर ब्रेकफास्ट करताय येईल, असंही एकाने लिहिलं आहे.

(हेही वाचा : मुकेश अंबानींची मोठी घोषणा, HD टीव्ही मिळणार मोफत )

यावर फोर सीझन्स या हॉटेलचं काय म्हणणं आहे ते माहीत नाही पण नेटकऱ्यांच्या मात्र चांगल्याच प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

 

=================================================================================================

VIDEO : 'ए... चूप बसायचं', मदतीची मागणी करणाऱ्या पूरग्रस्तावर चंद्रकांत पाटलांची अरेरावी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 12, 2019 03:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...