मुंबई विद्यापीठाच्या गलथान कारभारामुळे निकालांची परिस्थिती नियंत्रणाबाहेर- मुंबई हायकोर्ट

मुंबई विद्यापीठाच्या गलथान कारभारामुळे निकालांची परिस्थिती नियंत्रणाबाहेर- मुंबई हायकोर्ट

विद्यापीठाच्या निकालाच्या दिरंगाईविरोधात विधी विभागाच्या विद्यार्थ्यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टानं हे ताशेरे ओढले आहेत.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई, 21 आॅगस्ट : मुंबई विद्यापीठाच्या गलथान कारभारामुळेच यंदाच्या निकालांची परिस्थिती सगळ्यांच्या नियंत्रणाबाहेर असल्याचे खरमरीत ताशेरे मुंबई हायकोर्टानं ओढले आहेत. विद्यापीठाच्या निकालाच्या दिरंगाईविरोधात विधी विभागाच्या विद्यार्थ्यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टानं हे ताशेरे ओढले आहेत.

दरवर्षी १ आॅगस्टला विधी विभागाचा अभ्यासक्रम सुरू होणं अपेक्षित आहे पण यंदा अजून विज्ञान, कला, वाणिज्य शाखांचे निकाल लागले नसल्यानं बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे असं याचिकाकर्त्यांच्या वतीनं सांगण्यात आलं. त्यावर हे सगळं सर्वसामान्य परिस्थितीत शक्य आहे पण मुंबई विद्यापीठाच्या कारभारामुळे परिस्थिती सगळ्यांच्याच नियंत्रणाबाहेर गेली असल्याचं मत कोर्टाने नोंदवलं.

याचिकाकर्त्यांनी आणखी एक मुद्दा कोर्टासमोर आणला, तो म्हणजे आॅनलाईन पेपर तपासणीवेळी मुख्य उत्तरपत्रिका आणि पुरवणी उत्तरपत्रिका सुट्या करुन त्या आॅनलाईन तपासल्या जातात. पण आॅनलाईन तपासणी झाल्यानंतर पुरवणी उत्तरपत्रिका या एकत्र जोडल्या न गेल्यानं कोणती पुरवणी उत्तरपत्रिका नेमकी कोणाची याचा काहीच मेळ बसत नसल्यानं विद्यार्थ्यांचे खरे गुण मिळणं अवघड आहे असंही याचिकाकर्त्यांनी कोर्टाला सांगितलं.

उद्या या प्रकरणाची सुनावणी होणार अाहे त्यावेळेस विद्यापीठ आणि राज्य सरकार काय भूमिका मांडतं हे पाहावं लागेल.

First published: August 21, 2017, 4:48 PM IST

ताज्या बातम्या