बकरी ईदसाठीच्या तयारीवर मुंबई हायकोर्ट समाधानी

बकरी ईदसाठीच्या तयारीवर मुंबई हायकोर्ट समाधानी

यंदाच्या बकरी ईदसाठी राज्य सरकार आणि पोलिसांनी केलेल्या तयारीवर मुंबई हायकोर्टानं समाधान व्यक्त केलं असून गौरक्षकांच्या मुद्यावर दाखल केलेली याचिका निकाली काढली आहे.

  • Share this:

23 आॅगस्ट : यंदाच्या बकरी ईदसाठी राज्य सरकार आणि पोलिसांनी केलेल्या तयारीवर मुंबई हायकोर्टानं समाधान व्यक्त केलं असून गौरक्षकांच्या मुद्यावर दाखल केलेली याचिका निकाली काढली आहे.

येत्या २ सप्टेंबरला बकरी ईद आहे,त्या पार्श्वभूमीवर कथित गौरक्षकांचे हल्ले रोखण्यासाठी मुंबई हायकोर्टानं राज्य सरकार आणि पोलिसांसाठी  मार्गदर्शक तत्त्वं जारी करावेत अशी याचिकाकर्ते शादाब पटेल यांनी याचिका दाखल केली होती.

मुंबई पोलीस आयुक्त आणि राज्य गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांच्या वतीनं हायकोर्टाला बकरी ईदकरता करण्यात आलेल्या सुरक्षा उपाययोजनांची माहिती देण्यात आली. त्यावर हायकोर्टानं समाधान व्यक्त केलं अाणि याचिका निकाली काढली.  बकरी ईदच्या दरम्यानच गणेशोत्सव असल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये अशी विनंती पटेल यांनी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2017 04:16 PM IST

ताज्या बातम्या