Home /News /mumbai /

दीरानं लंडनमध्ये 60 लाखांत दिली वहिनीच्या हत्येची सुपारी, मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश

दीरानं लंडनमध्ये 60 लाखांत दिली वहिनीच्या हत्येची सुपारी, मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश

मटका किंग सुरेश भगत याची पत्नी जया भगत आणि तिची बहीण सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत.

मुंबई, 22 डिसेंबर: मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रॅंचकडून (Mumbai Police Crime Branch) एका हायप्रोफाइल हत्येच्या सुपारीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी 5 आरोपींना अटक केली आहे. सुमारे 60 लाख रुपये सुपारी देवून हत्येच्या कटाचा उलगडा झाला आहे. मुंबईतील मटका किंग सुरेश भगत (Mataka king Sursh  Bhagat) याची पत्नी जया भगत (Jaya Bhagat) आणि तिची बहिणीच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे ही सुपारी सुरेश भगत याचा भाऊ विनोद भगत (Vinod Bhagat) यानं दिल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. विनोद भगतनं लंडन येथील एका व्यक्तीला सुमारे 60 लाख रुपयांत दोघांच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती पोलिस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. हेही वाचा...ड्रग केसमध्ये अडकलेली बॉलिवूड अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह मटका किंग सुरेश भगत याची पत्नी जया भगत आणि तिची बहीण सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. या दोघींवर सुरेश भगत याची हत्या केल्याचा आरोप आहे. सुरेश भगतचा भाऊ विनोद याला आपल्या भावाच्या हत्येचा बदला घ्यायचा होता. त्यातूनच त्यानं वहिनी जया भगत आणि तिच्या बहिणीच्या हत्येची सुपारी दिली होती. विनोद भगतनं लंडन येथील मामूला दोघांच्या हत्येची सुपारी दिली होती. त्यानुसार मामूनं उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे ती सुपारी फिरवली होती. हेही वाचा...लंडनहून भारतात आलेल्या विमानात सापडले 5 कोरोना पॉझिटिव्ह बिजनौरच्या आरोपींनी अहमदाबाद आणि मुंबई येथील आरोपींच्या मदतीनं जया भगत आणि तिच्या बहिणीची रेकी केली होती. पण हत्या करण्याआधीच मुंबई क्राईम ब्रँचनं 2 आरोपींना अटक केली. आरोपीकडून देशी कट्टे आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. नंतर पोलिसांनी बिजनौर येथून एक तर गुजरातमधील पालनपूर येथून एक अशा पाच आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी लंडन येथील असून तो फरार आहे.  याप्रकरणी आणखी काही धागेदोरे हाती लागतात काय, याचाही शोध पोलिस घेत आहेत.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Mumbai, Mumbai police

पुढील बातम्या