मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /डीएसकेंना देश सोडून जाण्यास कोर्टाचा मज्जाव

डीएसकेंना देश सोडून जाण्यास कोर्टाचा मज्जाव

डीएसके यांनी कोर्टाने तिसऱ्यांदा दिलेली पैसे भरण्याची हमी देखील बनाव होता असा दावा सरकारी पक्षातर्फे करण्यात आला आहे.

डीएसके यांनी कोर्टाने तिसऱ्यांदा दिलेली पैसे भरण्याची हमी देखील बनाव होता असा दावा सरकारी पक्षातर्फे करण्यात आला आहे.

डीएसके यांनी कोर्टाने तिसऱ्यांदा दिलेली पैसे भरण्याची हमी देखील बनाव होता असा दावा सरकारी पक्षातर्फे करण्यात आला आहे.

    16 फेब्रुवारी : डीएसकेंना देश सोडून जाण्यास कोर्टानं मज्जाव केलाय. सर्व विमानतळांना तशा सूचना देण्याचे सरकारला निर्देश केलेत.बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णींच्या अटकपूर्व जामीनअर्जावर सुनावणी सुरू झालीय. .जेल होणार की बेल मिळणार यावर थोड्याच वेळात निर्णय होणार आहे.

    पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्यासंबंधी मुंबई हायकोर्टात सुरु असलेल्या सुनावणीत एक मोठा खुलासा झाला आहे. डीएसके यांनी कोर्टाने तिसऱ्यांदा दिलेली पैसे भरण्याची हमी देखील बनाव होता असा दावा सरकारी पक्षातर्फे करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावरच्या या आरोपाचा मोठा खुलासा आज मुंबई हायकोर्टात होणार आहे.

    बुलडाणा पतपेढी संस्थेनं डीएसके यांची संपत्ती विकत घेऊन त्यांना १०० कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली होती. पण मुळात जी संपत्ती डीएसके यांनी बुलढाणा पतपेढीकडे सादर केली होती ती सर्व संपत्ती आधीच महाराष्ट्र बँकेकडे गहाण आहे तर काही संपत्तीवर शासनाचे एमिनेटीस आरक्षण आहे. अशी धक्कादायक माहिती विशेष सरकारी वकील वीरा शिंदे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणुन दिली आहे.

    याआधी प्रभुणे इंटरनॅशनल या डीएसकेंच्याच एका परदेशस्थ कंपनीमार्फत ५१ कोटी रुपये डीएसकेंच्या बँक ऑफ बडोदा या भारतीय बँकेतील खात्यात जमा केली जाणार आहे असा दावा डीएसके यांच्यातर्फे करण्यात आला होता. मात्र ही रक्कम अजुनही डीएसकेंच्या भारतीय खात्यात जमा झालेली नाही.

    एका सुनावणी वेळी प्रभुणे इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद प्रभुणे हे हायकोर्टात जातीनं हजर झाले होते आणि प्रभुणे यांनी ५१ कोटींची रक्कम डीएसकेंच्या खात्यात जमा करणार असल्याची हमी हायकोर्टात जातीनं हजर राहून दिली होती. त्यानंतर १ फेब्रुवारीपर्यंत बँक ऑफ बडोदामध्ये हे पैसे जमा होतील अशी डीएसकेंकडून कबुली देण्यात आली होती तो देखील एक बनाव होता असं सरकारी वकीलांनी न्यायालयात म्हटलं आहे.

    त्यानंतर २२ फेब्रुवारीला डीएसके यांच्या अटकपूर्व जामीनावर हायकोर्ट निकाल देणार होते. मात्र आज सरकारी वकीलांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार विशेष सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे डीएसकें यांचे नेमके काय होईल याकडेच आज सगळ्यांच लक्ष लागून आहे.

    First published:
    top videos