मुंबई, 17 जानेवारी: एक मोठी बातमी समोर आली आहे. आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane bail application) यांचा जामिन अर्ज नाकारण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टाचे (Mumbai high court) न्यायमूर्ती सी.व्ही. भडंग यांनी हा निकाल दिला आहे. नितेश राणे यांच्यावर कणकवली पोलीस स्टेशन मध्ये हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. शिवसेनेचे पदाधिकारी संतोष परब यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
भाजप आमदार नितेश राणेंना हायकोर्टानं दणका दिला आहे. नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं नाकारला. मात्र मनिष दळवींना हायकोर्टाकडनं अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कणकवली येथील शिवसेना तसेच भाजप कार्यालयाबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
याआधी सिंधुदुर्ग सेशन कोर्टाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज केला. त्यावर आज सुनावणी पार पडली आहे. नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटळण्यात आला आहे.
अर्जावर दोन्ही बाजूचे युक्तिवाद पूर्ण झाला होता. त्यानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. त्यावर आज कोर्टाने निकाल जाहीर केला आहे.
Bombay High Court to pronounce its order today on Maharashtra BJP MLA Nitesh Rane's anticipatory bail plea in connection with an alleged attempt to murder case.
(file photo) pic.twitter.com/q8czrNBISd — ANI (@ANI) January 17, 2022
काय आहे प्रकरण?
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. या हल्ल्याचा कट रचण्यात आमदार नितेश राणे यांचा सहभाग होता, असा आरोप परब यांनी केला आहे. या हल्ल्याच्या कटाचे धागेदोरे नितेश राणे यांच्यापर्यंत कसे पोहोचतात, याचे पुरावे सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयात सादर केले होते. त्यामध्ये काही कॉल डिटेल्सचाही समावेश होता. त्याची खातरजमा करण्यासाठी नितेश राणे यांचा फोन जप्त करणं गरजेचं आहे, असा युक्तीवाद त्यांनी केला होता. या प्रकरणाचा तपास निष्पक्षपातीपणे होण्यासाठी नितेश राणे अटकेत आहे, असा दावा सरकारी वकिलांनी केला होता. हा दावा मान्य करत कोर्टानं राणेंचा जामीन अर्ज फेटाळला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai high court, Nitesh rane