• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • राज कुंद्राला कोर्टाचा झटका, जामीन अर्ज फेटाळला, तुरुंगातच राहावं लागणार

राज कुंद्राला कोर्टाचा झटका, जामीन अर्ज फेटाळला, तुरुंगातच राहावं लागणार

सॉफ्ट पॉर्नप्रकरणी (Soft porn case) सध्या न्यायालयीन कोठडीत (Judicial custody) असलेला उद्योगपती राज कुंद्राला (Raj Kundra) जामीन देण्यास मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) नकार दिला आहे.

 • Share this:
  मुंबई, 28 जुलै : सॉफ्ट पॉर्नप्रकरणी (Soft porn case) सध्या न्यायालयीन कोठडीत (Judicial custody) असलेला उद्योगपती राज कुंद्राला (Raj Kundra) जामीन देण्यास मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) नकार दिला आहे. आपली अटक बेकायदेशीर (Illegal) असून आपल्याला तातडीने जामीन देण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज राज कुंद्राने हायकोर्टात दाखल केला होता. त्यावर सुनावणी करताना राज कुंद्राची अटक बेकायेदशीर असल्याचा दावा कोर्टाने अमान्य केला. राज कुंद्राला जामीन देण्यास कोर्टाने नकार दिल्यामुळे त्याच्या अडचणीत चांगलीच वाढ होणार आहे. कोठडी कायम राज कुंद्राच्या जामीनावर मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राज कुंद्राला आणखी 7 दिवस पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. राज कुंद्राचे सिटी बँक आणि कोटक महिंद्रा बँकेची गाठी गोठवल्याची माहितीदेखील पोलिसांनी न्यायालयाला दिली. याचवेळी आपली अटक बेकायदा असल्याचा दावा करत राज कुंद्राने जामीन मिळवण्याचा प्रयत्न चालवला होता. मात्र त्याच्यासोबत रायन थोर्पेच्या जामीनाची मागणीदेखील कोर्टानं फेटाळून लावली. काय आहे आरोप? राज कुंद्रावर बेकायदेशीररित्या सॉफ्ट पॉर्न व्हिडिओ तयार करून ते वेगवेगळ्या कंपन्यांना विकल्याचा आरोप आहे. या व्यवहारातून आलेले पैसे तो ऑनलाईन बेटिंगसाठी वळवत असल्याचे पुरावेदेखील पोलिसांना मिळाले आहेत. राज कुंद्रानं स्वतःची कंपनी विकली असली, तरी तो त्या कंपनीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सक्रिय होता आणि कंपनीच्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयामध्ये त्याचा सहभाग होता, असा दावा पोलिसांनी केला आहे. हे वाचा - या' बँकेला RBI ने ठोठावला 1 लाख रुपयांचा दंड, वाचा काय आहे कारण राज कुंद्राच्या या सॉफ्ट पॉर्न बनवण्याच्या वर्तुळात आणखी कोण कोण सक्रिय आहे आणि त्यातील आर्थिक गैरव्यवहाराचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.
  Published by:desk news
  First published: