Home /News /mumbai /

विधानपरिषद निवडणूक : मलिक- देशमुखांचा मतदानाचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला

विधानपरिषद निवडणूक : मलिक- देशमुखांचा मतदानाचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत मतदान करता यावं अशी मागणी करणारी याचिका राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दाखल केली होती.

    मुंबई 17 जून : महाराष्ट्रात विधान परिषद (Vidhan Parishad) निवडणुकीसाठी 20 जून रोजी मतदान होणार आहे. यामुळे महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत मतदान करता यावं अशी मागणी करणारी याचिका राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दाखल केली होती. मात्र महाविकासआघाडीला मोठा झटका बसला आहे. आता हा विधानपरिषद मतदान अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. विधानपरिषद निवडणूक : अजित पवारांची काँगेस नेत्यांसोबत बैठक; मुख्यमंत्री नाराज, शिवसेनेचं 'हॉटेल पॉलिटिक्स' अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार याक्षी यांनी हा अर्ज फेटाळला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री असून त्यांना 23 फेब्रुवारी 2022 रोजी अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयाने यापूर्वीच त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. मात्र, आता पुन्हा एकदा त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात अजितदादांसोबत काय घडलं? फडणवीसांनी केला मोठा खुलासा याआधी विशेष पीएमएलए कोर्टाने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची राज्यसभेसाठी मतदान करण्याची याचिका फेटाळून लावली होती. यानंतर आता उच्च न्यायालयानेही मतदानासाठीची याचिका फेटाळली आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देत आशिष शेलार म्हणाले की महाविकासआघाडीची नकारघंटा वाजण्यास सुरूवात झाली आहे. आता भाजपाची शुभ वेळ सुरू झाली आहे. ही भाजपाच्या विजयाची सुरूवात झाली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे..
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Anil deshmukh, Nawab malik

    पुढील बातम्या