S M L

हायकोर्टाच्या कानउघडणीनंतर टोल याचिकेतून मुख्यमंत्र्यांचं नाव वगळलं

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे चा टोल बंद करण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिवादी करण्याबद्दल नीट विचार करा अशी समज मुंबई हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना दिली आहे.

Sachin Salve | Updated On: Apr 26, 2017 06:54 PM IST

हायकोर्टाच्या कानउघडणीनंतर टोल याचिकेतून मुख्यमंत्र्यांचं नाव वगळलं

विवेक कुलकर्णी, मुंबई

26 एप्रिल : मुंबई पुणे एक्स्प्रेस वे चा टोल बंद करण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिवादी करण्याबद्दल नीट विचार करा अशी समज मुंबई हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना दिली. हायकोर्टाच्या कानउघडणीनंतर अखेर याचिकेतून मुख्यमंत्र्यांचं नाव वगळण्यात आलं.

मुंबई पुणे येथील एक्स्प्रेस वे वरील टोल वसुली पूर्ण होऊनही टोल आकारला जात असल्याने तिथला टोल बंद करण्यात यावा अशी मागणी करणारी जनहित याचिका आरटीआय कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर, सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर, आणि श्रीनिवास घाणेकर यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे.

यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री  (सार्वजनिक उपक्रम), उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, म. रा. र. वि. महामंडळ मर्यादित, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व मे. म्हैसकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

आज सुनावणी दरम्यान कोर्टाने याचिकर्त्यांनी मुख्यमंत्रांना प्रतिवाद करण्याबद्दल विचार करावा असं हायकोर्टाने म्हटलं आहे.  हायकोर्टाच्या कानउघडणीनंतर याचिकाकर्त्यांनी माघार घेतली असून मुख्यमंत्र्यांचं नाव याचिकेतून वगळलंय. दरम्यान, या याचिकेवर सहा आठवड्यात सरकारने उत्तर द्यावं असा आदेश देत हायकोर्टाने सुनावणी ८ आठवड्यांसाठी तहकूब केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2017 06:50 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close