मेट्रो ३ ला मुंबई हायकोर्टाचा हिरवा कंदील

एमएमआरसीएलनं झाडांचं पुनर्रोपण करण्याच्या तयारी दाखवल्यामुळे हायकोर्टाने मेट्रो 3 ला हिरवा कंदील दिलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 5, 2017 05:32 PM IST

मेट्रो ३ ला मुंबई हायकोर्टाचा हिरवा कंदील

विवेक कुलकर्णी, मुंबई

05 मे : मुंबई मेट्रो 3 चा मार्ग अखेर मोकळा झालाय. मुंबई हायकोर्टाने या प्रकल्पासाठी ५ हजार झाडांच्या कत्तलीसाठीची बंदी हटवली आहे. एमएमआरसीएलनं झाडांचं पुनर्रोपण करण्याच्या तयारी दाखवल्यामुळे हायकोर्टाने मेट्रो 3 ला हिरवा कंदील दिलाय.

मेट्रो 3 साठी तब्बल 5 हजार झाडांची कत्तल होणार होती. त्यामुळे  चर्चगेट-नरिमन पाॅईंट रहिवाशी संघटनेच्यावतीने याचिका दाखल करण्यात आली होती. झाडांच्या कत्तलीवर घालण्यात आलेली बंदी उठवण्याची विनंती मुंबई रेल्वे रेल्वे महामंडळ लिमिटेडच्या (एमएमआरसीएल) वतीने न्यायालयाकडे करण्यात आली होती.

यावर कोर्टाने आज (शुक्रवारी) आपला निर्णय दिलाय. एमएमआरसीएलने मेट्रो 3 च्या मार्गात जी झाडं तोडली जातील त्याबदल्यात झाडांचं पुनर्रोपण करण्याची हमी दिली. यावर कोर्टाने समाधान व्यक्त करत झाडांच्या पुनर्रोपणावर लक्ष ठेवण्यासाठी हायकोर्टाच्या दोन न्यायाधीशांची समिती मुख्य न्यायमूर्ती स्थापन करणार आहे.

मेट्रो ही पर्यावरणपूरक सेवा असून मेट्रोमुळे लाखो प्रवाशांची सोय होणार असल्याने ती महत्त्वाची सेवा आहे असं मतही हायकोर्टाने नोंदवलं. तर या निर्णयाविरोधात याचिकाकर्त्यांना सुप्रीम कोर्टात अपिलासाठी १० दिवसांची मुदत देण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 5, 2017 05:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...