धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वावरच काम करा, कोर्टाने ठाणे पालिकेला सुनावले खडेबोल

धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वावरच काम करा, कोर्टाने ठाणे पालिकेला सुनावले खडेबोल

"बेकायदा मंडपांविरोधात कारवाई का केली नाही असा सवाल कोर्टानं केल्यानंतर अशी कारवाई करताना लोकांच्या धार्मिक भावनांचा प्रश्न निर्माण होतो असं ठाणे मनपातर्फे कोर्टाला सांगण्यात आलं"

  • Share this:

09 नोव्हेंबर : बेकायदा मंडपांच्या प्रकरणावर सुनावणी दरम्यान धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वावरच महापालिकांनी आपलं काम केलं पाहिजे असे खडेबोल मुंबई हायकोर्टाने ठाणे महापालिकेला सुनावले आहे.

बेकायदा मंडपांविरोधात कारवाई का केली नाही असा सवाल कोर्टानं केल्यानंतर अशी कारवाई करताना लोकांच्या धार्मिक भावनांचा प्रश्न निर्माण होतो असं ठाणे मनपातर्फे कोर्टाला सांगण्यात आलं त्यावेळेस कोर्टाने हे मत व्यक्त केलं आहे.

ही कारवाई आम्हाला करायची आहे असं सांगून तुम्ही पोलिसांची मदत का घेतली नाही असा सवाल केल्यानंतर ठाणे मनपाला उत्तर देता आले नाही.

सण, उत्सव साजरे करण्यासाठी लोकांना थांबवलं गेलं नाही पाहिजे असं ठाणे मनपाच्या वतीनं म्हणण्यात आल्यावर सण, उत्सव साजरे करण्यापासून कोणी रोखलंय असा सवाल कोर्टाने केला.

त्यावर कोणाचंही नाव घेणं मनपातर्फे टाळण्यात आलंय. ठाणे मनपाच्या बेकायदा मंडपांविरोधात कारवाई न करण्याऱ्या ठाणे मनपाच्या कारभारावर कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून ठाणे मनपाच्या आयुक्तांना यावर लेखी उत्तर मागितलं आहे.

First published: November 9, 2017, 6:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading