अजाॅय मेहता, हाजीर हो !

अजाॅय मेहता, हाजीर हो !

मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत मुंबई पालिका प्रशासन उदासीन का ?, असा सवालही कोर्टाने विचारला आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई

04 सप्टेंबर : मुंबई हायकोर्टाने धोकादायक इमारतींबाबत दाखवलेल्या बेफिकीर वृत्तीबाबत मुंबई महापालिका आयुक्तांवर करावाई का करु नये असा संतप्त सवाल करत मुंबई हायकोर्टाने मनपा आयुक्त अजोय यांना ८ सप्टेंबरला स्वत: जातीने कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत मुंबई पालिका प्रशासन उदासीन का ?, असा सवालही कोर्टाने विचारला आहे. कोर्टात फक्त मोठमोठे वकील ठेवले म्हणजे आपली जबाबदारी संपत नाही अशा शब्दात कोर्टाने मनपाचा खरपूस समाचार घेतला आहे.

धोकादायक इमारतींबाबत एल वाॅर्डातील रहिवासी विजय मॅंटेना यांनी दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने हे मत व्यक्त केलं आहे. गेल्या काही दिवसात मुंबईत इमारती कोसळून अनेक जणांचे प्राण गेले आहेत. नुकतीच भेंडी बाजार परिसरातील हुसैनी इमारत कोसळली होती. त्या पार्श्वभूमीवर कोर्टाने व्यक्त केलेलं मत महत्त्वाचे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 4, 2017 06:48 PM IST

ताज्या बातम्या