06 मे: कोर्टाची प्रक्रिया म्हणजे तारीख पे तारीख हे जणू समिकरणच बनलंय. कारण बऱ्याच काळ खटल्यांच्या सुनावण्या या प्रलंबितच राहतात. मात्र, हेच खटले प्रलंबित राहू नयेत म्हणून मुंबई हायकोर्टाचं कामकाज पहाटे साडेतीनपर्यंत सुरू होतं.
मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती शाहरुख कथावाला यांनी खटले त्वरीत निकाली निघावेत यासाठी हा मार्ग स्विकारला आहे. त्यांनी वेळेची कुठलीही तमा न बाळगता पहाटे साडे तीन वाजेपर्यंत सुनावणीचं कामकाज सुरुच ठेवलं. त्यांच्या या कामगिरीनं विक्रम प्रस्थापित केलाय. स्वाभाविकपणे त्यांच्या या कामाचं सर्व स्तरातून कौतूक होतंय.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु होण्यापूर्वीचा मुंबई हायकोर्टाचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. अशा वेळी न्यायामूर्ती शाहरुख कथावाला यांनी खचाखच भरलेल्या न्यायालयात पहाटे साडे तीन वाजेपर्यंत विविध खटल्यांवर सुनावणी घेतली. तसेच अनेक खटल्यांवर त्यांनी आदेशही दिले.त्यांचे सहाय्यक, शिरस्तेदार असे इतर न्यायालयीन कर्मचारीही साडे तीन पर्यंत उपस्थित होते. पहाटे ३.३०पर्यंत वकीसुद्धा आपले युक्तीवाद मांडत होते. त्यामुळे इतक्या पहाटे उच्च न्यायालय इमारतीत शुकशुकाट असताना केवळ पहिल्या मजल्यावरील या २० क्रमांकाच्या कोर्टरूममध्ये खच्चून गर्दी होती. याहूनही विशेष बाब म्हणजे पहाटे घरी गेल्यानंतरही शनिवारी पुन्हा सकाळी १०.३० वाजता न्या. काथावाला हे आणखी प्रकरणांची सुनावणी घेण्यासाठी आपल्या चेंबरमध्ये उपस्थित होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cases, High court, India, Maharashtra, Mumbai