Home /News /mumbai /

उच्च न्यायालयात आज परमबीर सिंग,अनिल देशमुख यांसारख्या महत्त्वपूर्ण याचिकांवर सुनावणी

उच्च न्यायालयात आज परमबीर सिंग,अनिल देशमुख यांसारख्या महत्त्वपूर्ण याचिकांवर सुनावणी

मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Mumbai High Court) आज अनेक महत्त्वपूर्ण याचिकांवर सुनावणी आहे. यात काही रिट याचिका आहेत तर काही एफआयआर रद्द करण्यासंदर्भातील याचिका आहेत.

मुंबई, 06 मे: मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Mumbai High Court) आज अनेक महत्त्वपूर्ण याचिकांवर सुनावणी आहे. यात काही रिट याचिका आहेत तर काही एफआयआर रद्द करण्यासंदर्भातील याचिका आहेत. माझी मुंबई पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग (Parambir singh) यांनी आपल्या विरोधात दाखल केलेले गुन्हे सीबीआयकडे वर्ग करावेत, त्यासोबतच कल्याण येथे बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला आपल्या विरोधातील ॲट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करावा अशी विनंती पर याचिका सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात केल्या आहेत. यासोबतच वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी आपल्यावर कोणतीही कठोर कारवाई न करण्याची विनंतीपर याचिका मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. यावरदेखील आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे. फोन टॅपिंग प्रकरणी वरिष्ठ आयपीएस अधिकारी ज्या केंद्रात प्रतिनियुक्ती करता गेल्या आहेत आणि ज्या सध्या हैदराबाद येथे कार्यरत आहेत, अशा रश्मी शुक्ला यांना मुंबई सायबर सेलने दोन वेळा चौकशीला हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. या समन्सला रश्मी शुक्ला यांनी ई-मेलवर उत्तर दिले होते. तसेच ईमेलमार्फत आपली चौकशी करावी, अशी विनंती त्यांनी तपास यंत्रणेला केली होती. मात्र, तरी देखील त्यांना चौकशी करता समन्स धाडण्यात आले. या समन्सच्या आधारे रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. आपल्यावर हेतूपुरस्पर कारवाई केली जात असून आपल्याला या कारवाईमध्ये दिलासा मिळावा, माझ्यावर कोणतीही कठोर कारवाई करू नये, अशी विनंती रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयाला याचिकेतून केली आहे. हे वाचा - ‘शरीर साथ देईल तोपर्यंत जबाबदारीपासून पळणार नाही’, या 2 गर्भवती नर्स करतायंत कोरोना रुग्णांची अविरत सेवा त्यामुळे आज परमवीरसिंग आणि रश्मी शुक्ला या दोन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयातून दिलासा मिळतो की, त्यांच्या समस्या वाढतात हे आज न्यायालयात स्पष्ट होईल. तर दुसरीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनीदेखील आपल्यावर सीबीआयने दाखल केलेली याचिका रद्द करावी, अशी मागणी केली आहे. तर  देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांच्यावर हेतूपुरस्पर कारवाई केली जात आहे असा आरोप महाविकास आघाडी सरकारने सीबीआयवर केला आहे. सीबीआयने देशमुख यांच्या विरोधात दाखल केलेला FIR रद्द करावी, अशी मागणी अनिल देशमुख आणि महाविकास आघाडी सरकार यांनी एकत्रित केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख आणि राज्य सरकार यांना या याचिकेच्या सुनावणी दरम्यान दिलासा मिळतो की, न्यायालय यांना दिलासा देण्यास नकार देणार तेदेखील आज होणाऱ्या सुनावणीतून स्पष्ट होईल.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: Anil deshmukh, Mumbai high court, The Bombay High Court

पुढील बातम्या