कंगनाच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी पूर्ण, संजय राऊतांनी दिले उत्तर

कंगनाच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी पूर्ण, संजय राऊतांनी दिले उत्तर

मुंबई महापालिकेनं कंगना राणावत हिच्या वांद्रे येथील पाली हिलमधील कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली होती.

  • Share this:

मुंबई, 05 ऑक्टोबर : बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावत हिच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेनं तोडकाम केले होते. अखेर या प्रकरणावर मुंबई उच्चन्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. उच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे.

मुंबई महापालिकेनं कंगना राणावत हिच्या वांद्रे येथील पाली हिलमधील कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली होती. त्यानंतर कंगनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई पालिकेनं माझ्या बंगल्यावर केलेली  कारवाई ही बेकायदेशीर आणि सूडापोटी होती, असा दावा कंगनाच्या वकिलांनी केला आहे.

तर, 'या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नाही, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. तसंच, जे काम अनधिकृत होते, त्याच्यावर पालिकेनं केलेली  कारवाई योग्यच होती', या मतावर मुंबई पालिका ठाम आहे.

मुंबई उच्चन्यायलयाने दोन्ही गटांचा युक्तिवाद ऐकून घेतला आहे.  उच्च न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय देणार आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागले आङे.

कंगनाला खार येथील फ्लॅटबद्दल पालिकेनं बजावली नोटीस

दरम्यान, दुसरीकडे मुंबई महापालिकेनं (BMC) कंगनाला आणखी एक झटका देण्याची तयारी केली आहे. मुंबई पालिकेनं कंगनाच्या खार येथील फ्लॅटमध्ये केलेल्या बेकायदा बांधकामावरून नोटिस बजावली.

बीएमसीच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कंगना हिनं खार येथील आपल्या फ्लॅटमध्ये बीएमसीचे नियम धाब्यावर ठेऊन बांधकाम केलं आहे. तिनं अक्षरश: नियमांचा पायमल्ली केली आहे.

मुंबईताल खार वेस्ट येथील DB Breeze (Orchid Breeze)च्या 16 नंबर रोडवरील एका बिल्डिंगमध्ये कंगनाचा एक फ्लॅट आहे. बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावर कंगना राहते. विशेष म्हणजे, पाचव्या मजल्यावर कंगनाचे एकूण तीन फ्लॅट आहेत. त्यापैकी एक फ्लॅट 797 sqft दुसरा फ्लॅट 711sqft आणि तिसरा फ्लॅट 459 sqft आहे. तिन्ही फ्लॅट्स कंगनाच्या नावावर आहेत. 8 मार्च 2013 रोजी तिन्ही फ्लॅटची रजिस्ट्री झाली होती. कंगना हिनं फ्लॅट घेतल्यानंतर पाच वर्षांनी म्हणजेच 13 मार्च 2018 रोजी बीएमसीकडे एक तक्रार आली होती. तिनं फ्लॅट्समध्ये बेकायदा बांधकाम केल्याचं तक्रारीत म्हटलं होतं.

तक्रार मिळाल्यानंतर 26 मार्च 2018 रोजी बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी कंगनाच्या या फ्लॅट्सची पाहाणी केली होती. त्याच दिवशी कंगनाला BMC under 53/1 of MRTP act for unauthorized construction beyond plan नुसार नोटिस बजावण्यात आली होती. या नोटिशीला 27 मार्च 2014 रोजी बीएमसीच्या बैठकीत मंजुरी मिळाली होती.

Published by: sachin Salve
First published: October 5, 2020, 12:37 PM IST
Tags: BMC

ताज्या बातम्या