ईव्हीएमची फॉरेन्सिक चाचणी करण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश

ईव्हीएमची फॉरेन्सिक चाचणी करण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश

2014 मधल्या विधानसभा निवडणुकीत पुण्याच्या पर्वती मतदारसंघात वापरलेल्या ईव्हीएमची फॉरेन्सिक चाचणी करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत.

  • Share this:

08 मे : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात फेरफार होत असल्याचा आरोप वारंवार होतोय. त्या पार्श्वभूमीवर ईव्हीएमची फॉरेन्सिक चाचणी करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. 2014 मधल्या विधानसभा निवडणुकीत पुण्याच्या पर्वती मतदारसंघात वापरलेल्या ईव्हीएमची फॉरेन्सिक चाचणी करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत.

या निवडणुकीत भाजपच्या माधुरी मिसाळ यांचा विजय झाला होता. काँग्रेसचे पराभूत उमेदवार अभय छाजेड यांनी मतदानयंत्रात फेरफार झाल्याचा आरोप करत हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

'ईव्हीएम'ची फॉरेन्सिक टेस्ट, काय आहे प्रकरण?

- 2014 विधानसभा निवडणुकीत पर्वती मतदारसंघात घोळ झाल्याची तक्रार

- पराभूत उमेदवार अभय छाजेड हायकोर्टात

- बुथ क्र. 185 आणि 242 मध्ये घोळ झाल्याचा आरोप

- 89 जणांचं मतदान, पण मतमोजणीत 79 मतं मिळाली, छाजेड यांचा दावा

- ईव्हीएमशी छेडछाड झाल्याची छाजेड यांची तक्रार

First published: May 8, 2017, 12:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading