संपासंदर्भात राज्य सरकार काही करतंय का?-हायकोर्टाने सरकारला फटकारलं

संपासंदर्भात राज्य सरकार काही करतंय का?-हायकोर्टाने सरकारला फटकारलं

एसटी संपासंदर्भात हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. 'काही ठोस करताय का ते सांगा इतर काही ऐकण्यात कोर्टाला रस नाही' अशा शब्दात कोर्टाने राज्य सरकारला फटकारलं आहे.

  • Share this:

मुंबई,20 ऑक्टोबर: गेले 4 दिवस राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे. त्यासंदर्भात राज्य सरकारला हाय कोर्टाला फटकारलं आहे.

एसटी संपासंदर्भात हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. 'काही ठोस करताय का ते सांगा इतर काही ऐकण्यात कोर्टाला रस नाही' अशा शब्दात कोर्टाने राज्य सरकारला फटकारलं आहे. तसंच काही ठोस फॉर्म्यूला केलाय का? काही पॉलिसी केलीय का? कोर्ट निगोसीएशन करायला बसलं नाहीये असे खडे बोलही हायकोर्टाने सुनावले. संप सुरु होण्याआधी आणि सुरु झाल्यानंतर राज्य सरकारने काय उपाय योजना केल्या ते न्यायालयात सादर करा. लोकांसाठी पर्यायी व्यवस्था काही केलीये का? हायपॉवर कमिटीचं काय झालं? राज्य सरकार काहीच करत नाहीये आणि त्रास जनतेला सहन करावा लागतोय असंही कोर्टाने सांगितलं आहे. तोडगा निघण्यासाठी राज्य सरकारने एक तरी सकारात्मक पाऊल टाकावे अशी सूचना हाय कोर्टाने सरकारला केली आहे.

तर त्याचवेळी संप का पुकारला याबाबत एसटी  कर्मचाऱ्यांनाही हाय कोर्टाने सवाल केले आहेत. त्यावर 90 टक्के कर्मचारी संपावर जाण्यासाठी तयार असल्यामुळे संप पुकारला असं उत्तर कर्मचारी संघटनांनी दिलं आहे. तसंच प्राथमिक पगारवाढ झाल्यावर संप मागे घेणार का असा सवालही हाय कोर्टाने एसटी कर्मचारी संघटनांना केला आहे. त्यावर मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यास आम्ही संप मागे घेऊ अशी भूमिका एसटी कर्मचारी संघटनांनी घेतली आहे. तसंच सोमवारी उच्च स्तरीय समिती बसवली जाईल अशी माहिती राज्य सरकारने हाय कोर्टात दिली आहे.

त्यामुळे एसटी संपावर आता तोडगा दिवाळी नंतरच निघण्याची चिन्हं आता दिसू लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 20, 2017 05:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading