S M L

मुंबईत नव्या बांधकामांवर बंदी उठवायला हायकोर्टाचा नकार

मुंबईत नव्या बांधकामांवर एक वर्षांपूर्वी घातलेली बंदी उठवण्यास मुंबई हायकोर्टाने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.

Sachin Salve | Updated On: May 4, 2017 06:50 PM IST

मुंबईत नव्या बांधकामांवर बंदी उठवायला हायकोर्टाचा नकार

04 मे : मुंबईत नव्या बांधकामांवर एक वर्षांपूर्वी घातलेली बंदी उठवण्यास मुंबई हायकोर्टाने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.

पर्यावरणपूरक पद्धतीने मुंबईतील घनकचरा व्यवस्थापनाची कोणतीही पावलं मुंबई महापालिकेनं न उचलल्यानं बंदी उठविण्याचा प्रश्नच नसल्याचं न्यायमूर्ती अभय ओक आणि चंद्रकांत भडंग यांच्या खंडपीठाने ही मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे.

महाराष्ट्र चेंबर आॅफ हाऊसिंग इंटस्ट्रीने या बद्दलची याचिका दाखल केली होती. गेल्या वर्षी म्हणजे २०१६ फेब्रुवारीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापनावर ताशेरे ओढत नव्या बांधकामांवर बंदी घातली होती. हा बंदीचा निर्णय घेताना बिल्डरांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलं नव्हतं असं म्हणत याचिका केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 4, 2017 06:50 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close