मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /BREAKING : डंके की चोट पर, कोर्टाचा सदावर्तेंना मोठा दणका, 2 वर्षांसाठी वकिली रद्द

BREAKING : डंके की चोट पर, कोर्टाचा सदावर्तेंना मोठा दणका, 2 वर्षांसाठी वकिली रद्द

मराठा आरक्षण आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलना दरम्यान मीडियासमोर चुकीची वक्तव्य

मराठा आरक्षण आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलना दरम्यान मीडियासमोर चुकीची वक्तव्य

उच्च न्यायालयाने देखील सदावर्ते यांच्या विरोधातील शिस्तभंगाची कारवाई थांबवण्यास नकार दिला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 मार्च : एसटी कर्मचाऱ्यांसाठी आंदोलन करणारे ऍड गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. राज्य बार काऊन्सिल आणि ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी सदावर्ते यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. त्यामुळे दोन वर्ष वकिली करण्यास मज्जाव केला आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला चिथावणी दिल्याचा सदावर्ते यांच्यावर आरोप होता.

तसंच काळा कोट परिधान केलेला असताना हातात पट्टी बांधणे हे वकिली पेश्याला साजेशे नसून त्यांनी मराठा आरक्षण आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलना दरम्यान मीडियासमोर चुकीची वक्तव्य केल्याचा दावा करत सदावर्ते यांच्याविरोधात बार कौन्सिलकडे करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने देखील सदावर्ते यांच्या विरोधातील शिस्तभंगाची कारवाई थांबवण्यास नकार दिला होता.

(तर 'हे' सगळं फडणवीसांनीच घडवून आणलं, तानाजी सावंतांचा मोठा गौप्यस्फोट)

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या सदस्याने म्हटलं आहे की, अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात सविस्तर सुनावणी झाली. त्याच्यावर हा आरोप व्हायरल झालेल्या एका व्हिडिओचा होता ज्यामध्ये तो वकिलाचा बँड घालून आझाद मैदानात एका आंदोलनादरम्यान नाचताना दिसत होता.

(लाईट गेले म्हणून धमकी, फडणवीसांच्या घरात बॉम्ब असल्याचा फोन!)

सदावर्ते यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची आणि स्वत:चा बचाव करण्याची संधी देण्यात आली होती. तथापि, सदावर्ते यांनी त्यांच्या कृत्याचा बचाव केला आणि अखेरीस 27 मार्च रोजी तीन सदस्यीय शिस्तपालन समितीने सदावर्ते यांच्या विरोधात आदेश पारित करून त्यांचा सरावाचा परवाना दोन वर्षांसाठी निलंबित केल्याचे सांगण्यात आले. सदावर्ते, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयातील काही प्रकरणांमध्ये हजेरी लावण्यासाठी दिल्लीत होते, तथापि, अशी कोणतीही सुनावणी झाल्याचे नाकारले आणि त्यामुळे त्यांना या आदेशाची माहिती नव्हती. समितीने दिलेला आदेश मात्र सदावर्ते यांना आदेश मिळाल्यावरच अंमलात येईल, असे नमूद केले आहे.

काय आहे प्रकरण?

गुणरत्न सदावर्ते आणि वाद हा नवीन विषय नाही. महाविकास आघाडी सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबईत आंदोलन केलं होतं. त्यावेळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी हिंसक आंदोलन केलं होतं. या हिंसक आंदोलनाप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांना भडकवणं आणि सिल्व्हर ओकवर हल्ला करण्याच्या आरोपांखाली सदावर्तेंना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा केल्याचं प्रकरण समोर आलं. यानंतर सदावर्तेंवर एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक करुन खोटे आश्वासन देवून पैसे वसूल केल्याच्या आरोपांप्रकरणे राज्यातील काही भागांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. तर काही ठिकाणी छत्रपती घराण्याच्या वंशजांवर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

First published:
top videos