मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

VIDEO: मिठी नदी ओसंडून वाहू लागली; आसपासच्या घरांत पाणीच पाणी, नागरिकांचं स्थलांतर

VIDEO: मिठी नदी ओसंडून वाहू लागली; आसपासच्या घरांत पाणीच पाणी, नागरिकांचं स्थलांतर

Miti River overflows water enters nearby localities: मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले तर मुंबईतील मिठी नदी ही ओसंडून वाहू लागली.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 9 जून : मुंबई शहर (Mumbai City), मुंबई उपनगरासह ठाणे (Thane), कल्याण डोंबिवली, वसई-विरार परिसरात काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस (Heavy rainfall) पडत होता. मुसळधार पावसामुळे आज मुंबईची तुंबई झाल्याचं दिसून आलं. अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचले (Water logging) होते तर रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचल्याने लोकल सेवेवर परिणाम झाला. मुंबईत झालेल्या या मुसळधार पावसामुळे मिठी नदी ओसंडून वाहू लागली (Mithi River overflows) आहे.

पहिल्याच पावसात मुंबईतील मिठी नदी ओव्हरफ्लो झाली. नदी ओसंडून वाहू लागल्याने नदीतील पाणी आसपासच्या सोसायटीत शिरले. मिठी नदीचं पाणी कुर्ला परिसरातील रहिवासी भागांत शिरले. त्यामुळे या सोसायट्यांमधील नागरिकांचे इतरत्र स्थलांतरण करण्यात आले आहे. या रहिवाशांना दरवर्षी अशाच प्रकारचा सामना करावा लागतो. मात्र, यंदा पहिल्याच पावसात ही अवस्था झाली आहे.

VIDEO : पावसाचं महाभयंकर रुप, पाहता पाहता पूल गेला वाहून

मुंबईला पावसाने दिवसभर अक्षरशः झोडपून काढलं, 12 तासात तब्बल 100 मिमीहून अधिक पाऊस झाला यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. आता दोन तासापासून मुंबईत पावसानं विश्रांती घेतली आहे. अनेक भागात पाणी ओसरत असून परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसत आहे.

मुंबईत कुठे किती पाऊस झाला?

मुंबई शहर - 102.29 मिमी

मुंबई पूर्व उपनगर - 169.17 मिमी

मुंबई पश्चिम उपनगर - 137.33 मिमी

हवामानाचा अंदाज

कुलाबा वेधशाळेने पुढील 24 तासांकरिता वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत गडगडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार तर इतर काही ठिकाणी मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Mumbai, Rain