मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुसळधार पावसामुळे लोकल सेवा ठप्प तर रस्त्यावर पाणी साचल्याने चाकरमान्यांचा खोळंबा

मुसळधार पावसामुळे लोकल सेवा ठप्प तर रस्त्यावर पाणी साचल्याने चाकरमान्यांचा खोळंबा

Heavy rain in Mumbai: मुंबई शहर, उपनगरासह ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे.

Heavy rain in Mumbai: मुंबई शहर, उपनगरासह ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे.

Heavy rain in Mumbai: मुंबई शहर, उपनगरासह ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे.

मुंबई, 9 जून: राज्यात मान्सूनचे (Monsoon) आगमन झाल्यानंतर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy rain) पडत असल्याचं पहायला मिळत आहे. मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), नवी मुंबई (Navi Mumbai), कल्याण (Kalyan), वसई-विरार परिसरात काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवेवर (Local service disrupted) परिणाम झाला असून रस्त्यावरही पाणी साचल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली आहे. परिणामी संध्याकाळच्या सुमारास घरी जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच मुंबई आणि ठाण्याला हवामान विभागाने रेड अलर्ट (Red Alert for Mumbai Thane) सुद्धा जारी केला आहे.

सायन परिसरात रेल्वे रुळावर पाणी असल्यामुळे मध्य रेल्वेच्या मार्गावर वाहतूक ठप्प आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर ठाणे-कल्याण आणि हार्बर मार्गावर पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमान्यांनी सीएसएमटी स्थानकावर गर्दी केली आहे. पण वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद असल्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकात चाकरमान्यांची मोठी गर्दी झाल्याचं पहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या अनेक रेल्वे स्थानकांत ट्रॅकवर पाणी आले आहे. त्यामुळे वाहतूकीवर परिणाम झाला आहे. यासोबतच रस्ते वाहतुकीवर सुद्धा परिणाम झाल्याने कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांची घरी जाण्यासाठी आता कोंडी झाली आहे. रेल्वे ट्रॅकवरून जोपर्यंत पाण्याचा निचरा होत नाही तोपर्यंत रेल्वे सेवा सुरळीत होणार नाहीये त्यामुळे चाकरमान्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

हार्बर रेल्वेवर सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच मुंबईत झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतूक कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली आहे.

मुंबई-ठाण्यात रेड अलर्ट

मुंबई, ठाणे, रायगड परिसरात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. याच दरम्यान हवामान विभागाने मुंबई-ठाण्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच मुंबई आणि ठाण्याला रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे.

रत्नागिरीत पाच दिवस ऑरेंज अलर्ट

रत्नागिरी जिल्ह्यात 9 जून ते 13 जून या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्यातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, या सर्व कालावधीत रत्नागिरीसह लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून सोबतच मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

First published:

Tags: Central railway, Mumbai, Rain