मुंबई आणि इतर जिल्ह्यातील या 10 ठिकाणी कोसळतोय मुसळधार पाऊस

मुंबई आणि इतर जिल्ह्यातील या 10 ठिकाणी कोसळतोय मुसळधार पाऊस

मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरू आहे

  • Share this:

मुंबई, 08 जुलै: मुंबई शहर आणि उपनगरात शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा जोर वाढतच जात आहे. जोरदार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांत पाणी साचायला सुरूवात झाली असून रस्त्यांवरची वाहतूक संथगतीनं सुरू आहे. मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. या 10 ठिकाणी पावसामुळे पाणी साचून जनजीवन विस्कळीत झालं आहे.

- मुंबईतील सायन स्टेशन पश्चिमेकडचा धारावी आणि बीकेसीला जोडणाऱ्या रस्त्यावर पावसाचं पाणी साचलंय. त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करत गाड्या चालवाव्या लागतायंत.

- कुर्ला ते टिळकनगर स्थानकादरम्यान हार्बर रेल्वे मार्गावर रुळावर पाणी भरले आहे. कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असल्याने लोकल सेवा बंद आहे. प्रवाशी मात्र रुळावरून जात आहेत.

- मुंबईतल्या मुसळधार पावसानं चेंबूर पूर्व इथला लोखंडे मार्गही जलमय झालाय.

- लोकमान्य टिळक टर्मिनस ते विध्याविहार दरम्यान पाईप लाईन रोड वर पाणी भरले

- घाटकोपर पूर्व पश्चिमेला असलेल्या रेल्वे पुलाच्या पिलरला तडा गेल्यामुळे तो पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

- घाटकोपर येथीलच पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा वसंतराव नाईक लिंक रोडवरील पूल बंद करण्यात आला आहे. रेल्वेरुळावर असलेला हा पूल वाकला असल्याने हा पूल आज सकाळपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग म्हणून पंतनगर तसेच ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वरून वाहन धारकांना जावं लागतं आहे.

- मुंबईतल्या किंग्ज सर्कल या भागात पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने माटुंगा पुलावर वाहतूक कोंडी झाली आहे. या पूलाखालच्या भागात पाणी साचल्यानं वाहनं चालवणं अवघड झालं आहे.

- वसई माणिकपूर पोलीस स्टेशन हद्दीतील वसई पूर्व-पश्चिम मार्ग जोडणारा अंबाडी ओव्हर ब्रिज आज मध्यरात्रीपासून सुरक्षेच्या कारणास्तव पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

- माथेरानच्या घाटात दरड कोसळली. त्यामुळे तिकडून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सावधगिरी बाळगावी असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

- सिंहगड घाटात पहाटे दरड कोसळली आहे. यामुळे सिंहगड घात बंद ठेवण्यात आला आहे. ८ व ९ रोजी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने दरड कोसळण्याचा धोका आहे. घाटात पाऊस ३०० मिलिमीर पेक्षा जास्त आहे.

हेही वाचा:

मुंबईत मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी वाहतुक कोंडी

वसई पूर्व- पश्चिम मार्ग जोडणारा अंबाडी ओव्हर ब्रिज बंद

आता गाड्यांना धक्का मारण्यासाठी घेतले जातायेत पैसे

First published: July 8, 2018, 2:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading