News18 Lokmat

धक्कादायक: आता गाड्यांना धक्का मारण्यासाठी घेतले जातायेत पैसे

चालकाने पैसे देण्यास नकार दिला. मात्र त्या लोकांनी गाडीला चहू बाजूने घेरले आणि गाडी पुढे जाऊ देत नव्हते

News18 Lokmat | Updated On: Jul 8, 2018 02:35 PM IST

धक्कादायक: आता गाड्यांना धक्का मारण्यासाठी घेतले जातायेत पैसे

मुंबई, 08 जुलै: सर्वांच्या मदतीला धावून येणाऱ्यांमध्ये मुंबईकर आघाडीवर असतात असं म्हटलं जातं. पण नेमकी याच्या विरुद्ध होताना दिसत आहे. त्याचे झाले असे की, शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसांत वाहतुक कोंडी होत असल्यामुळे खूप वेळ गाड्या जागच्या हलतही नाही. पावसाचा जोर वाढल्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचायला सुरूवात झाली आहे. पण काही जण याच साचलेल्या पाण्याचा फायदा घेताना दिसत आहेत.

त्याचे झाले असे की, मुंबईत रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे अनेकांच्या गाड्या बंद पडत आहेत. अशीच एक ऑडी क्यू 7 ही गाडी इंजिनमध्ये पाणी गेल्यामुळे बंद पडल्यामुळे तिला धक्का मारावा लागणार होता. काही लोक त्यासाठी पुढे आलेही पण गाडीला धक्का मारुन झाल्यानंतर त्या माणसांनी चालकाला 5000 रुपये देण्याची मागणी केली. चालकाने पैसे देण्यास नकार दिला. मात्र त्या लोकांनी गाडीला चहू बाजूने घेरले आणि गाडी पुढे जाऊ देत नव्हते. शेवटी १५०० रुपयांवर कसंबसं या गाडीची त्या लोकांनी सुटका केली. असे प्रकार जर होतच राहिले तर या सगळ्या भयंकर प्रकाराकडे मुंबई पोलिसांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे हे मात्र नक्की.

हेही वाचा: भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

...म्हणून दिल्ली- पुणे विमानाची इंदौरला करण्यात आली 'इमरजन्सी लँडिंग'26 वर्षीय विद्यार्थी 

वसई पूर्व- पश्चिम मार्ग जोडणारा अंबाडी ओव्हर ब्रिज बंद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 8, 2018 01:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...