फेरीवाल्यांचा मनसे नेत्यांवर हल्ला,उपेंद्र शेवाळेंची प्रकृती चिंताजनक

फेरीवाल्यांचा मनसे नेत्यांवर हल्ला,उपेंद्र शेवाळेंची प्रकृती चिंताजनक

रविवारी रात्री उशिरा राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन ढोलम यांची भेट घेतली.

  • Share this:

27 नोव्हेंबर :  मुंबईत पुन्हा एकदा मनसे नेत्यावर हल्ला झालाय. विक्रोळीमध्ये विश्वजीत ढोलम आणि विनोद शिंदे यांच्यावर रविवारी फेरीवाल्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात मनसेचे उपशाखा अध्यक्ष उपेंद्र शेवाळेंच्या डोक्यात घातला पेवर ब्लाॅक घातला. शेवाळे यांची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरू आहे.

मनसेचे विक्रोळीतले उपविभाग अध्यक्ष विश्वजित ढोलम एका दुकानावर मराठी पाटी लावावी या मागणीसंदर्भात दुकानदाराला भेटण्यासाठी गेले होते. दुकानदार आणि ढोलम यांची चर्चा सुरू असताना परिसरातले फेरीवाले तिथं गोळा झाले, त्यांनी ढोलम आणि यांच्यावर हल्ला केला आणि बेदम मारहाण केली.

विश्वजीत ढोलम यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.  विश्वजीत ढोलम यांना मारहाण झाल्यानंतर मनसेचे पदाधिकारी पुन्हा त्या व्यापाऱ्याकडे जाब विचारायला गेले होते. तेव्हा  फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांना अजून मारहाण झाली. या मारहाणीत शिंदे आणि उपेंद्र शेवाळे हे जखमी झाले. या मारहाणीत उपेंद्र शेवाळे यांच्या डोक्यात फेरीवाल्यांनी पेव्हर ब्लाॅक घातला. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी रात्री उशिरा राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन ढोलम यांची भेट घेतली.

अलीकडेच, मनसेचे मालाडमधले नेते सुशांत माळवदे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. विक्रोळीच्या हल्ल्यावर मनसे काय प्रतिक्रिया देते, ते आता पहावं लागेल.

First published: November 27, 2017, 8:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading