मानखुर्दजवळ ओव्हरहेड वायर तुटली, हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2019 09:15 AM IST

मानखुर्दजवळ ओव्हरहेड वायर तुटली, हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

मुंबई, 24 एप्रिल : हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली आहे. पहाटेच्या वेळी मानखुर्द स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या बिघाडामुळे पनवेलकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. पनवेल ते सीएसएमटी वाहतूक देखील उशिराने सुरू आहे. यामुळे स्टेशनवर प्रचंड गर्दी झाली आहे. कार्यालय गाठण्याच्या वेळेसच हा बिघाड झाल्यानं प्रवासी संतापले आहेत. प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी हार्बर मार्गावरच्या प्रवाशांना ठाण्यावरून प्रवास करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

वाचा अन्य बातम्या

राज ठाकरेंसह आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार, कुणाची कुठे होणार सभा?

असदुद्दीन ओवैसींचा मोदींना खोचक प्रश्न, '5 वर्ष देश चालवला की पबजी खेळत होतात?

VIDEO: भिवंडीचे भाजप उमेदवार कपिल पाटील यांचा शेतीचा अजेंडा काय?

Loading...

VIDEO: हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत, ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2019 09:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...