मुंबई, 20 जानेवारी : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई मॅरेथॉनला आज उत्साहात सुरुवात झाली. मुंबई पुरूष हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाताने अव्वल स्थान मिळवलं तर महिलांमध्ये मिनू प्रजापती पहिली आली.
मुंबई हाफ मॅरेथॉनचं हे 16 वं वर्ष आहे. पहाटेपासून या मॅरेथॉनला सुरुवात झाली. या मॅरेथॉनमध्ये मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बॉक्सर मेरी कोमच्या हस्ते फ्लॅगऑफ करण्यात आलं.
यंदा विजेतेपदासाठी केनिया-इथिओपियाच्या धावपटूंना प्रबळ दावेदार मानले जात असलं तरी भारतीय धावपटू देखील चुरशीची लढत देताना दिसले.
मुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल
हाफ पुरुष मॅरेथॉनचे निकाल जाहीर झाले. यामध्ये श्रीणू मुगाता याचा पहिला क्रमांक, करण थापा याचा दुसरा तर कालिदास हिरवे याने तिसरा क्रमांक पटकावला आहे. तर महिलांमध्ये मिनू प्रजापती हिने बाजी मारली.
#MustWatch: Top 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का?