पालघर, 01 ऑक्टोबर : देशात एकीकडे कोरोनामुळे हळूहळू लॉकडाऊन झालेली अर्थव्यवस्था आणि कामकाज पुन्हा एकदा सुरू होत आहे. आजपासून देशासह महाराष्ट्रात अनलॉक 5 चा टप्पा सुरू होत असतानाच सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला आहे. भरधाव क्रेन आणि गॅस टँकरमध्ये धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की क्रेनचा चुराडा झाला आहे. आंबोली परिसरात हा अपघात झाला. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, वाहतूक विस्कळीत pic.twitter.com/H17k1xWexy
— News18Lokmat (@News18lokmat) October 1, 2020
हे वाचा-कोरोनामुळे महिलांपेक्षा पुरुषांचा मृत्यू जास्त का? समोर आलं धक्कादायक कारण
क्रेनंचा महामार्गावर अक्षरश: चुराडा झाला आहे. दरम्यान क्रेन महामार्गावरून हटवण्याचं काम सुरू आहे. तर मुंबईहून गुजरातच्या दिशेनं जाण्यासाठी महामार्गावर वाहनांच्या 3 किलोमीटरपर्यंत लांब रांगां लागल्या आहेत. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली असून सध्या धीम्या गतीन वाहतूक सुरू आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनीी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. गॅस टँकरची गाडी सुरक्षित आहे. गॅस टँकरच्या गाडीला काही झालं असतं तर गॅस सर्वत्र पसरला असता आणि मोठा अनर्थ घडू शकला असता. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीनं पर्यायी मार्गावरून वाहतूक वळवली असून सध्या महामार्गावरून क्रेन आणि गॅस टँकर हटवण्याचं काम सुरू आहे. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.