Home /News /mumbai /

Mumbai: जीएसटी विभागाची झवेरी बाजारात मोठी कारवाई, भिंतीत 10 कोटींची रोकड अन् 19 किलो चांदीच्या विटा सापडल्या

Mumbai: जीएसटी विभागाची झवेरी बाजारात मोठी कारवाई, भिंतीत 10 कोटींची रोकड अन् 19 किलो चांदीच्या विटा सापडल्या

भिंतीत 10 कोटींची रोकड अन् 19 किलो चांदीच्या विटा सापडल्या, GST विभागाची मुंबईत मोठी कारवाई

भिंतीत 10 कोटींची रोकड अन् 19 किलो चांदीच्या विटा सापडल्या, GST विभागाची मुंबईत मोठी कारवाई

10 Crore rupees cash and 19 kg silver found in wall in Mumbai: राज्य जीएसटी विभागाने गेल्या काही महिन्यांपासून जीएसटी चोरी शोधणे आणि कारवाईची मोहिम तीव्र केली असून हजारो कोटींची जीएसटी चोरी शोधण्यात यश मिळविले आहे.

मुंबई, 23 एप्रिल : जीएसटी चोरीच्या अनेक घटना समोर येत असतानाच आता मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्य जीएसटी विभागाने (State GST department) मुंबईतील झवेरी बाजार (Zaveri Bazar Mumbai) परिसरात मोठी कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान जीएसटी विभागाला भिंतीत लपवून ठेवण्यात आलेली 10 कोटींची रोकड, 19 किलो चांदीच्या विटा आढळून आल्या आहेत. (10 Crore rupees cash and 19 kg silver bricks found in wall) मुंबईच्या झवेरी बाजारातील मेसर्स चामुंडा बुलीयन या कंपनीची उलाढाल वर्ष 2019-20 मध्ये 22.83 कोटी रुपयांवरुन वर्ष 2020-21 मध्ये 652 कोटी आणि वर्ष 2021-22 मध्ये 1764 कोटी रुपयांपर्यंत संशयास्पदरित्या वाढल्याचे राज्य जीएसटी विभागाच्या विश्लेषणात लक्षात आले. त्यानंतर जीएसटी विभागाने टाकलेल्या छाप्यात कंपनीच्या अनेक शाखांची नोंदणी आढळून आली नाही. कंपनीच्या 35 चौरस मीटरच्या एका छोट्या जागेत जीएसटी विभागाला भिंतीत लपवून ठेवलेली 9 कोटी 78 लाखांची रोकड आणि 19 किलो वजनाच्या (13 लाख रुपये किमतीच्या) चांदीच्या विटा आढळून आल्या. वाचा : देवगिरी एक्सप्रेसवर सशस्त्र दरोडा; सिग्नलला कापड बांधून केली लूट राज्य जीएसटी विभागाने ही जागा सिलबंद केली असून प्राप्तीकर विभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाने ही रक्कम आणि मालमत्तेचा स्त्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. राज्य जीएसटी विभागाने गेल्या काही महिन्यांपासून जीएसटी चोरी शोधणे आणि कारवाईची मोहिम तीव्र केली असून हजारो कोटींची जीएसटी चोरी शोधण्यात यश मिळविले आहे. राज्य करविभागाचे सहआयुक्त राहूल द्विवेदी, उपायुक्त विनोद देसाई यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. जीएसटी चोरीविरुद्धची कारवाई या पुढच्या काळात अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती राज्य कर आयुक्त राजीव मित्तल यांनी दिली आहे. गेल्या महिन्यात ठाणे जिल्ह्यात मोठी कारवाई एका भामट्याने खोटे कागदपत्रे दाखवत शासनाची तब्बल 84 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. संबंधित घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे देशातील GST फसवणुकीची ही सर्वात मोठी घटना असल्याचं बोललं जात आहे. संबंधित घटना ही ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरातून समोर आली आहे. ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली आहे. आरोपीने शासनाची तब्बल 84 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं आता उघड झालं आहे. पोलिसांनी आरोपीला कल्याण इथून अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. संबंधित 49 वर्षीय आरोपीचं अशोक राजभर असं नाव आहे. त्याने हार्डवेअरींग आणि नेटवर्किंगचा व्यापार असल्याचं दाखवलं होतं. त्याने शासनासमोर सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये 475 कोटींचा खोटा व्यापार दाखवला होता. त्यातून त्याने शासनाची 84 कोटी रुपयांची फसवणूक केली.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime, GST, Mumbai

पुढील बातम्या