Home /News /mumbai /

मुंबईत यात्रेदरम्यान दोन गटात तुफान राडा; परिसरात कलम 144 लागू, 8 ते 10 जण जखमी, Watch Live Video

मुंबईत यात्रेदरम्यान दोन गटात तुफान राडा; परिसरात कलम 144 लागू, 8 ते 10 जण जखमी, Watch Live Video

धार्मिक वादातून राजधानी मुंबईच्या आरे कॉलनीत काल रात्री वाद शिगेला पोहोचला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं वाद निवळला सध्या या परिसरात कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

    मुंबई, 18 एप्रिल: हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) दिवशी दिल्लीतल्या जहांगीरपूरमध्ये (Jahangirpur) धार्मिक हिंसाचाराची घटना घडली. त्यानंतर अमरावतीच्या (Amravati) अचलपूर आणि परतवाडा या शहरात झेंडा लावण्यावरुन दोन गटात तुफान राडा झाला. या घटना ताज्या असताना आता मुंबईतून एका वादाची घटना समोर येत आहे. धार्मिक वादातून राजधानी मुंबईच्या आरे कॉलनीत काल रात्री वाद शिगेला पोहोचला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं वाद निवळला सध्या या परिसरात कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबईच्या गोरेगाव पूर्वेत आरे कॉलनीमध्ये गौतमनगर परिसरात काल संध्याकाळी शिव मंदिराचा माध्यमातून कळस यात्रा काढण्यात आली होती. मात्र या कळस यात्रेत रात्री आठच्या सुमारास दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. ज्यात आठ ते दहा लोक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भोंग्यासाठी परवानगी न घेतल्यास 3 मे नंतर...नाशिक पोलीस आयुक्तांचा वादग्रस्त आदेश या घटनेची माहिती मिळताच आरे पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. आरे पोलिसांनी 25 जणांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.यात आणखी काही आरोपीचा शोध आरे पोलीस घेत आहेत. सध्या गौतम नगर परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलेत. अमरावतीत झेंडा लावण्याच्या वादावरून दोन गटात तुफान राडा अमरावतीच्या अचलपूरमध्ये (Achalpur of Amravati) झेंडा लावण्या वरून दोन गटात राडा झाला आहे. दोन गटात वाद आणि दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. अचलपूर शहरातील दुल्हा गेटवर (Dulha Gate) झेंडा फडकवल्यामुळे दोन गटात तणाव निर्माण झाला. सद्यपरिस्थितीत अचलपूर आणि परतवाडा शहरात कलम 144 अंतर्गत संचारबंदी (curfew) लागू करण्यात आला आहे. रविवारी रात्रीची ही घटना असून पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला. जमावाने पोलिसांच्या दिशेने ही दगडफेक केली या दगडफेकीत एक पोलिस कर्मचारी जखमी असल्याची माहिती आहे. परिस्थिती चिघळू नये म्हणून संपूर्ण अचलपूर शहरात तसेच परतवाडा येथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्तासाठी तीन SRPFच्या कंपन्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अमरावती ग्रामीणचे 150 अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तर अकोला येथील 100 अधिकारी आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Mumbai

    पुढील बातम्या