Home /News /mumbai /

BREAKING : मुंबई-गोवा महामार्ग ठप्प; मुसळधार पावसामुळे कोकणातील नद्यांना उधाण

BREAKING : मुंबई-गोवा महामार्ग ठप्प; मुसळधार पावसामुळे कोकणातील नद्यांना उधाण

कोकणात मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

    मुंबई, 12 जुलै : रविवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणांना पावसानं (Rain) झोडपून काढलं आहे. आज पुण्यासह संपूर्ण कोकण,  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. आज रायगड, रत्नागिरी सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान खात्यानं रेड अलर्ट (Red alert) जारी केला आहे. (Mumbai Goa highway blocked due to heavy rain) दरम्यान एक महत्त्वापूर्ण बातमी समोर आली आहे. काजळी नदी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचल्याने चिंता वाढली आहे. राजापूर पुलापर्यंत पाण्याची पातळी पोहोचली आहे. येथील पुल ब्रिटीशकालीन असल्याकारणाने धोका टाळण्यासाठी प्रशासनाने मुंबई-गोवा महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसामुळे राजापूर शहराच्या अर्जुना आणि कोदवली नदीला पूर आला आहे. शहरातील मुख्य भागतील जवाहर चौकात तीन फुटांपर्यंत पाणी भरलं आहे. या कारणामुळे व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांमधील सामान सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. येथे सोमवारपासून पाऊस सुरू असून मंगळवारीदेखील कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. हे ही वाचा-Raigad: काशीद बीच समोरील पूल कोसळल्याने एक कार आणि बाईक गेली वाहून, पाहा PHOTOS दरम्यान काल रायगड - मुरुड रस्त्यावरील काशिद गावाजवळील नदीवरील जुना पूल जोरदार पावसात वाहून (Bridge washed away in Raigad) गेला होता. पूल कोसळल्यामुळे अलिबाग-मुरुड हा रस्ता बंद झाला होता. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने मुंबई-गोवा महामार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती समोर आली आहे. हवामान विभागाकडूनही कोकणातील अनेक राज्यांना अलर्ट जारी केला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Goa, Mumbai, Rain

    पुढील बातम्या