पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या मुलींनी असा शोधला छुपा कॅमेरा, घरमालकाविरोधात गुन्हा दाखल

पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या मुलींनी असा शोधला छुपा कॅमेरा, घरमालकाविरोधात गुन्हा दाखल

पेईंग गेस्ट म्हणून घरात राहणाऱ्या मेडिकलच्या दोन विद्यार्थिनींच्या एक धक्कादायक प्रकार लक्षात आला. गिरगावात त्या ज्या घरात पेईंग गेस्ट म्हणून राहात होत्या, तो घरमालकच छुपा कॅमेरा लावून मुलींच्या सगळ्या हालचाली शूट करत होता. हा प्रकार या मुलींच्या लक्षात कसा आला ते पाहा....

  • Share this:

मुंबई, 25 डिसेंबर : पेईंग गेस्ट म्हणून घरात राहणाऱ्या मेडिकलच्या दोन विद्यार्थिनींच्या एक धक्कादायक प्रकार लक्षात आला. गिरगावात त्या ज्या घरात पेईंग गेस्ट म्हणून राहात होत्या, तो घरमालकच छुपा कॅमेरा लावून मुलींच्या सगळ्या हालचाली शूट करत होता. अॅडाप्टर असल्याचं सांगत त्यांनं छुपा कॅमेरा त्यामध्ये दडवला होता. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर पोलिसांनी घरमालकाला अटक केली आहे.

मुंबईतल्या सुप्रतिष्ठित गिरगाव भागात हा प्रकार उघडकीला आल्याने खळबळ उडाली आहे. या भागात गावागावातून आलेल्या अनेक विद्यार्थिनी पेईंग गेस्ट म्हणून राहतात. गिरगावातल्या एका घरात या तीन मेडिकल स्टुडंट्स जूनपासून राहात होत्या. खिडकीजवळ असणाऱ्या अॅडाप्टरवर या मुलींनी पडदा लावला, तेव्हा पडद्यामुळे सिग्नल मिळत नसल्याचं सांगत घरमालकानं पडदा हटवायला लावला तेव्हा या मुलींना अॅडाप्टरविषयी शंका आली. त्यांनी गुगलवर या अॅडाप्टरविषयी माहिती शोधली, तेव्हा त्यांना त्यात छुपा कॅमेरा असल्याचं लक्षात आलं.

या कॅमेऱ्याच्या मदतीनं घरमालक या मुलींच्या प्रत्येक हालचाली टिपत होता आणि त्यांचं संभाषणही त्यामध्ये रेकॉर्ड होत होतं. हे प्रकरण उघडकीला येताच या मुलींनी थेट पोलिसांकडे तक्रार नोंदवली

पोलिसांनी चौकशी करून आरोपी घरमालकाचा मोबाईल जप्त केला आहे. या मोबाईलवर त्याला खोलीतले व्हिडिओ दिसत होते, असं पोलिसांनी सांगितलं. माहिती तंत्रज्ञानाचा गैरवापर केल्याचा गुन्हा घरमालकावर नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

VIDEO : बनावट नोटा तयार करत होता RTI चा कार्यकर्ता; 1 कोटींच्या नोटा जप्त

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2018 04:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading