मुंबईत पावसाची संततधार

मुंबईत पावसाची संततधार

पावसानं पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरांना झोडपून काढायला सुरुवात केली आहे. सखल भागांतही पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

  • Share this:

27 जून : पावसानं पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरांना झोडपून काढायला सुरुवात केली . सखल भागांतही पाणी साचायला सुरुवात झाली.दादर, हिंदमाता या भागांमध्ये रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली होती. मुंबईच्या अन्य भागांमध्येही पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले.

पहाटेपासून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस मुंबईत सुरु होता. तीन दिवसांच्या सुट्टीनंतर ऑफिसला येणाऱ्या चाकरमान्यांचे मात्र हाल होणार आहेत. पश्चिम पूर्व उपनगरांमध्येही पावसाचा जोर कायम असल्याने त्याचा फटका जाणवण्याची शक्यता आहे.

दरम्यान या पावसाचा परिणाम पूर्व पश्चिम आणि हार्बर रेल्वेमार्गावरही होण्याची शक्यता असल्याने मुंबईचा वेग काहीसा मंदावण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2017 09:42 AM IST

ताज्या बातम्या