मुंबई, 10 ऑगस्ट: मुंबईतील (Mumbai) गणेशोत्सव (Ganeshotsav 2021) संदर्भात आज महत्वाच्या दोन बैठका (Meeting) होत आहे. कोरोना निर्बंधामुळे गेल्या वर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा लागला. त्यानंतर यंदा तरी उत्सवावरील नियमातून सूट मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र कोरोनाचे संकट कायम असल्यानं यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध आलेत. त्यामुळं नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात या बैठका होत आहेत.
मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती आणि मुंबई महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात पालिकेच्या परळ येथील एफ दक्षिण वाँर्ड ऑफिसमध्ये सकाळी 11.30 वाजता एक बैठक होणार आहे.
मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची मुंबई पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या सोबत सायंकाळी 4 वाजता मुंबई पोलीस आयुक्त कार्यलयात दुसरी बैठक होत आहे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या समस्यांचा उहापोह या बैठकीत होईल.
पोटच्या पोरीनंच केला घात, नुकतीच 10 वी पास झालेल्या मुलीकडून आईची हत्या
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मागील वर्षापासून विविध उपक्रम, कार्यक्रम, सार्वजनिक उत्सव, सण अत्यंत साधेपणाने साजरे करण्यात आले. यंदाही कोरोनाचं सावट असल्यानं यंदाचे सणही साधेपणानं साजरे होण्याची शक्यता आहे.
मोहरमसाठी राज्य सराकरची नवी नियमावली
मोहरमच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीव सरकारनं काही निर्बंध लागू केले आहेत.
मनाला चटका लावणारी बातमी...म्हणून या वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूची चर्चा गावभर
वाझ मजलीस तसंच मातम मिरवणुका काढू नये, असं आवाहन सरकारने केलं आहे. घरात राहून दुखवटा पाळा असंही राज्य सरकारने म्हटलं आहे. मोहरम ताजिया काढू नये आणि साध्या पद्धतीने मोहरम पाळण्यात यावा असं राज्य सरकारनं जारी केलेल्या नियमावलीत म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dagdusheth ganpati, Mumbai