मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Mumbai Ganesh Visarjan 2021: मुंबई पालिका गणेश विसर्जनासाठी सज्ज, गणेश मंडळांनी पालिकेच्या मार्गदर्शक सूचना एकदा नक्की वाचा

Mumbai Ganesh Visarjan 2021: मुंबई पालिका गणेश विसर्जनासाठी सज्ज, गणेश मंडळांनी पालिकेच्या मार्गदर्शक सूचना एकदा नक्की वाचा

Ganesh Visarjan 2021:  गणेश विसर्जनासाठीच्या मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

Ganesh Visarjan 2021: गणेश विसर्जनासाठीच्या मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

Ganesh Visarjan 2021: गणेश विसर्जनासाठीच्या मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

मुंबई, 19 सप्टेंबर: Ganesh Visarjan 2021: गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2021) आज सांगता होत आहे. कोविड 19 (Corona Virus) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणानेच गणेशभक्तांनी साजरा केला. राज्य सरकार, मुंबई महापालिका (BMC)आणि मुंबई पोलीस (Mumbai Police) यांनी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच गणेश विसर्जन करण्यात येणार आहे.

गिरगाव चौपाटीवर आज मुंबईतल्या अनेक गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे. यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. चौपाटी परिसरात गर्दी होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जातं आहे. तसंच मुंबई महापालिका यंदाच्या गणेश विसर्जनासाठी सज्ज झाली आहे. कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव असल्यानं मुंबईत निर्बंध लागू केलेत. गणेश विसर्जनासाठीच्या मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

‘कोविड’ च्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पालिकेनं केलं आहे.

जाणून घेऊ या मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना

सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी हार / फुले इ. चा कमीत-कमी वापर करुन कमीत-कमी निर्माल्य तयार होईल, याची दक्षता घ्‍यावी. तसेच घरगुती स्वरुपात गणेशोत्सव साजरा करणा-यांनी देखील याबाबत दक्षता घ्यावी.

घरगुती गणेशाची मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतोवर घरच्या-घरी बादलीत किंवा ड्रममध्‍ये करावे.

पुढच्या वर्षी लवकर या! गणेश विसर्जनासाठी मुंबई पालिकेसह पोलीस सज्ज

गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या-घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचे विसर्जन करण्यात यावे. तसेच सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी देखील नजीकच्‍या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचे विसर्जन करण्‍यास प्राधान्‍य द्यावे.

घरगुती गणेशोत्‍सवाच्‍या विसर्जनाच्या वेळी मिरवणुकीने जाऊ नये, विसर्जनासाठी जास्तीत-जास्त पाच व्‍यक्‍ती असाव्‍यात. शक्‍यतोवर या व्‍यक्तिंनी ‘कोविड-19’ या रोगाच्‍या लसीकरणचे दोन डोस घेतलेले असावेत व दुसरा डोस घेवून 15 दिवस झालेले असावेत.

घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करताना, संपूर्ण चाळीतील / इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी एकत्रितरित्या नेवू नयेत

विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत-कमी वेळ थांबावे. विसर्जन प्रसंगी मास्‍क / शिल्‍ड इ. स्‍वसंरक्षणाची साधने काटेकोररित्‍या वापरण्‍यात यावी.

लहान मुले व वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जावू नये.

युवराज सिंह बनला 'सिक्सर किंग', ब्रॉडच्या एकाच ओव्हरमध्ये लगावले होते 6,6,6,6,6,6 पाहा VIDEO

सार्वजनिक गणेशमूर्तींच्‍या विसर्जनाच्‍यावेळी 10 पेक्षा अधिक लोक असणार नाहीत. जे उपस्थित असतील त्‍यांनी मास्‍क वापरावे आणि सामाजिक अंतर पाळावे.

तसेच सदर 10 व्‍यक्तींना शक्‍यतो ‘कोविड-19’ या रोगाच्‍या लसीकरणचे दोन डोस घेतलेले असावेत आणि दुसरा डोस घेवून 15 दिवस झालेले असावेत. तसेच कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक काढण्‍यात येवू नये.

सार्वजनिक गणशोत्‍सव मंडळांनी मंडपापासून विसर्जन स्‍थळापर्यंत मूर्ती असलेले वाहन मिरवणुकीसारखे अत्‍यंत धीम्‍या गतीने नेवू नये, तर वाहनातील गणेशमूर्तीला इजा पोहोचणार नाही अशा सामान्‍य गतीने वाहन विसर्जन स्‍थळी घेवून जावे. विसर्जना दरम्‍यान वाहन थांबवून रस्‍त्‍यांवर भाविकांना गणेशमूर्तीचे दर्शन घेवू देण्‍यास / पूजा करुन देण्‍यास सक्‍त मनाई आहे.

गणरायाला आज निरोप! मुंबईची शान 'लालबागचा राजा' ची मिरवणूक साधेपणानं

सन 2021 च्या गणेशोत्‍सवा दरम्‍यान कोणत्‍याही मिरवणुकीस परवानगी नाही, याची देखील भाविकांनी नोंद घ्‍यावी.

मुंबई शहरात एकूण 73 नैसर्गिक विसर्जन स्‍थळे आहेत. तेथे महापालिकेद्वारे अतिरिक्‍त मनुष्‍यबळ देवून मूर्ती संकलनाची शिस्‍तबद्ध व्‍यवस्‍था उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे. त्‍यांच्याकडे गणेशमूर्ती देण्‍यात यावी. या नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर नागरिकांनी किंवा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांनी थेट पाण्‍यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्‍यास प्रतिबंध आहे.

नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवरील गर्दी कमी होण्‍यासाठी महापालिकेच्‍या 24 विभागांमध्‍ये सुमारे 173 ठिकाणी कृत्रिम तलाव देखील निर्माण करण्‍यात आले आहेत. कृत्रिम तलावालगत राहणा-या भाविकांनी शक्‍यतोवर सदर कृत्रिम तलावाचा वापर करावा.

महापालिकेच्‍या काही विभागांतर्गत काही गणेशमूर्ती संकलन केंद्रे निर्माण करण्‍यात आली आहेत.

मूर्ती संकलन केंद्रावर, कृत्रिम तलावांवर किंवा नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर उपलब्‍ध महापालिकेच्‍या व्‍यवस्‍थापनाकडे मूर्ती सूपूर्द करण्‍यापूर्वी मूर्तीची यथासांग पूजा व आरती घरीच किंवा मंडळाच्‍या मंडपातच करुन घेणे बंधनकारक आहे.

विसर्जना दरम्‍यान सामाजिक दूरीकरण अंतर, मास्‍क / मुखपट्टी, सॅनिटायझर वापरणे इत्‍यादी संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

प्रतिबंधित क्षेत्र मध्‍ये असणा-या सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाच्‍या मूर्तीचे विसर्जन मंडपातच करावयाचे आहे किंवा विसर्जन पुढे ढकलावयाचे आहे. सील्‍ड इमारतींमधील गणेशमूर्तीच्‍या विसर्जनासाठी घरीच व्‍यवस्‍था करावयाची आहे, याची कृपया नोंद घ्‍यावी.

घर / इमारत गणेशोत्सव कालावधीत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्यास प्रतिबंधित क्षेत्र नियमांचे पालन करण्यात यावे.

LIVE Updates: पुण्यातल्या पाच मानाच्या गणपतींची विसर्जन वेळ

बृहन्‍मुंबई महानगरपालिका / पोलिस प्रशासन यांनी घालून दिलेल्‍या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्‍यात यावे.

उत्सव प्रसंगी अशी कोणतीही कृती करु नये, जेणेकरुन कोरोना विषाणूचा फैलाव होईल. अन्यथा अशा व्यक्ती कारवाईस पात्र ठरेल.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने सर्व विसर्जनस्‍थळी सर्व ती व्‍यवस्‍था केली असून मुंबईकर गणेशभक्‍त नागरिकांनी कोविड या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर सर्वतोपरी काळजी घेऊन श्रीगणरायाला भावपूर्ण निरोप द्यावा, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनाद्वारे पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

First published:
top videos

    Tags: BMC, Mumbai muncipal corporation