LIVE UPDATE मुंबई : मृतांच्या आकड्यात वाढ, डोंगरी इमारत दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू

LIVE UPDATE मुंबई : मृतांच्या आकड्यात वाढ, डोंगरी इमारत दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू

मुंबईतील डोंगरी परिसरात एक चार मजली इमारत कोसळली असून 40 ते 50 जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • Share this:

मुंबई, 16 जुलै: डोंगरी परिसरात एक चार मजली इमारत कोसळली आहे. केसरबाई ही 4 मजली निवासी इमारत कोसळली असून या घटनेत अनेक जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, इमारतीमध्ये 15 कुटुंब राहत होती. त्यामुळे ढिगाऱ्याखाली 50 जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अब्दुल हमीद दर्ग्याच्या शेजारी असलेली केसरबाई इमारत सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास कोसळली. या घटनेची माहिती स्थानिकांनी आपत्कालीन विभागाला दिली. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 40 ते 50 लोक अडकल्याची प्राथमिक माहिती मिळते. इमारत कोसळल्यानंतर अग्निशामक दल आणि बचाव पथके रवाना झाली असून बचावकार्य सुरू आहे.

डोंगरीत 4 मजली इमारत कोसळली; ग्राऊंड झिरोवरून पहिला VIDEO

LIVE UPDATE

- इमारत दुर्घटनेला मुख्यमंत्री जबाबदार-जयंत पाटील

- नागरिकांना दुर्घटनेच्या स्थळापासून दूर रहावे-मुंबई पोलिसांचे आवाहन

- इमारत 100 वर्ष जुनी होती- मुख्यमंत्री

- विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे घटनास्थळी दाखल

- आतापर्यंत 7 जणांना बाहेर काढले

- एका लहान मुलाला सुखरुप बाहेर काढण्यात आले.

- दोघांचा मृत्यू तर 5 जण जखमी झाल्याची पालिकेच्या अधिकाऱ्यांची माहिती.

- ढिगाऱ्याखाली महिला आणि लहान मुल अधिक अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

- 80 वर्ष जुनी इमारत होती

- ढिगाऱ्याखालून चौघांना बाहेर काढले, दोन लहान मुलांचा देखील समावेश

- डोंगरी परिसर दाटीवाटीचा असल्यामुळे बचाव कार्यात अडथळे

- अग्निशमन दलाचे अधिकारी आणि NDRF पथकाकडून मदत आणि बचाव कार्य सुरू

- इमारतीमध्ये 15 कुटुंब राहत होती. त्यात 40 ते 50 जण अडकल्याची शक्यता

- म्हाडाची इमारत, धोकादायक होती

- दुपारी साडेअकराच्या सुमारास 4 मजली इमारत कोसळली

इमारत कोसळून 12 जणांचा मृत्यू, चिमुरड्याला ढिगाऱ्याबाहेर काढतानाचा LIVE VIDEO

दुर्घटनेचे वृत्त कळताच मुंबई अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच घटनास्थळी NDRFचे पथक दाखल झाले आहे. दोन्ही पथकाकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. डोंगरी हा परिसर दाटीवाटीचा आहे. इमारत कोसळल्यानंतर घटनास्थळी स्थानिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. त्यामुळे मदत कार्यात अडथळे निर्माण होत आहेत.

डोंगरी इमारत दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू

मृतांचा आकडा वाढला, 10 जणांचा मृत्यू

मुख्यमंत्रिपदावरून युतीत वादाची ठिणगी; नाशिकमध्ये शिवसेनेकडून पोस्टरबाजी

First published: July 16, 2019, 12:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading