मुंबई पादचारी पूल दुर्घटना: ही आहेत मृतांची नावे

मुंबई पादचारी पूल दुर्घटना: ही आहेत मृतांची नावे

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सजवळील संध्याकाळी 7.30 च्या सुमारास पादचारी पूल कोसळला.

  • Share this:

मुंबई, 14 मार्च : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सजवळील संध्याकाळी 7.30 च्या सुमारास पादचारी पूल कोसळला. या दुर्घटनेत 4 जणंचा मृत्यू तर 34 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जखमींवर सेंट जॉर्ज हॉस्पिटल आणि सायन रुग्णालयात उपचार केले जात आहेत. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यापैकी अपूर्वा प्रभू आणि रंजना तांबे या नर्स असून त्या रात्रपाळीसाठी जीटी रुग्णालयात जात होत्या.

मुंबई पालिका आणि रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार मृतांची नावे

- अपूर्वा प्रभू (वय 35 )

- रंजना तांबे (वय 40)

- झाहीद खान (32)

- सारीका कुलकर्णी (35)

- तपेंद्र सिंग (35)

संबंधित बातमी-

PHOTO थरार....असा कोसळला CSMT जवळचा पूल

मुंबईच्या CSMT जवळील पादचारी पूल अपघाताचा पहिला VIDEO

...आणि पुलावरचे लोक खाली कोसळले

CSMTचा पुल कोसळला: एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर मुंबईकर पुन्हा हादरले

ही बातमी अपडेट होत आहे. पालिका आणि रुग्णालयातून देण्यात येणाऱ्या माहितीनुसार आम्ही मृतांची नावे अपडेट करत आहोत.

 

मुंबईच्या CSMT जवळील पादचारी पूल अपघाताचा पहिला VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: mumbai
First Published: Mar 14, 2019 09:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading