पहिल्याच पावसाने मुंबापुरीला झोडपलं

पहिल्याच पावसाने मुंबापुरीला झोडपलं

अखेर मान्सूनने मुंबापुरीत दमदार एंट्री केलीये. मुंबईसह राज्यभरात पावसाने हजेरी लावत चिंब भिजवलंय.

  • Share this:

12 जून : अखेर मान्सूनने मुंबापुरीत दमदार एंट्री केलीये. मुंबईसह राज्यभरात पावसाने हजेरी लावत चिंब भिजवलंय. विजांच्या कडकडासह आलेल्या पावसाने नागरिकांची त्रेधातिरपट उडाली.

मुंबईतील सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली.

मुंबईसह राज्यभरात मान्सूनने दमदार हजेरी लावली. विजांच्या कडकडासह पावसाने जोरदार धुमशान घातलं.  लोअर परळ ,वरळी, लालबाग  आणि दादर परिसरात मुसळधार पाऊस झाला.   पहिल्याच पावसाने मुंबईची लाईफलाईन स्लो ट्रॅकवर आली. मध्य आणि हार्बरमार्गावरील लोकल धीम्या गतीने सुरू आहे.

तर अनेक भागात वीज कोसळल्याच्या घटना घडल्या. तसंच काही भागांत जोरदार वादळामुळे झाडे उन्मळून पडल्यानं वाहतुकीची कोंडी झाली.

मराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानाबा, नांदेडमध्ये जोरदार पाऊस झाला. नांदेडमध्ये वीज कोसळून पाच महिलांचा मृत्यू झाला. पुण्यातही मान्सूनने जोरदार सलमी दिली. दोन तास बरसलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाल्याचे चित्र दिसत होते. मनमाडमध्येही पावसाने हजेरी लावली.

Loading...

येत्या 48 तासांमध्ये कोकणासही मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याने इशारा दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2017 10:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...