मुंबई, 21 जुलै: मुंबईतील एका हाय प्रोफाईल परिसरातील इमारतीला आग लागली आहे. कुलाबा येथील जगप्रसिद्ध असलेल्या ताज हॉटेलजवळच्या एका इमारतीला रविवारी दुपारी आग लागली. या घटनेचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे. पण काही जण इमारतीत अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आतापर्यंत 9 जणांना बाहेर काढले आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. मृत झालेल्या व्यक्तीचे नाव शाम अय्यर (वय-54) असे असल्याचे कळते.
Mumbai: One person has lost his life, one injured, in fire that broke out on the 3rd floor of Churchill Chamber building on Merryweather Road near Taj Mahal Hotel in Colaba today. https://t.co/Cy2wkk35UN
— ANI (@ANI) July 21, 2019
कुलाबा३ येथील ताज हॉटेल जवळच्या चर्चिल चेंबर या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर दुपारी 12.17 मिनिटांनी आग लागली. अग्निशमन दालने दिलेल्या माहितीनुसार ही आग लेव्हल-2ची होती. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण इमारतीत अद्याप काही जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दालाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि मदत, बचाव कार्य सुरु केले. जवानांनी शिडीच्या मदतीने सर्वांना सुखरुप बाहेर काढले. याआधी मुंबईतील लोअर परळ येथील कमला मिल कंपाउंडमधील एका हॉटेलला 29 डिसेंबर 2017 रोजी आग लागली होती. एका हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत तेव्हा 15 जणांचा मृत्यू झाला होता. कमला मिल येथील घटनेनंतर मुंबईतील इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
VIDEO: मुंबईतील चर्चिल चेंबरमधील आगीवर नियंत्रण, परिसरात धुराचे लोट
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा