मुंबईत बांबू गल्लीला भीषण आग, धुराच्या लोटांचा लोकांना फटका

मुंबईत बांबू गल्लीला भीषण आग, धुराच्या लोटांचा लोकांना फटका

  • Share this:

मुंबई 28 डिसेंबर :घाटकोपरला खैरानी रोड परिसरात एका गोडाऊनला भीषण आग लागलीय. या परिसरात बांबू व्यावसायिकांची मोठी गोदामं असून त्यातल्या काही गोदामांना ही आग लागलीय. आगीमुळे धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरले असून वाहतुकीलाही अडथळा निर्माण झालाय. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्यात आणि त्यांनी बचाव कार्याला सुरुवात केली. सर्व दुकानांमध्ये बांबू असल्याने आग भडकली आणि धुराचे काळे लोट आकाशात पसरले. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत सातत्याने आगी लागत असून या घटना वाढल्याने अग्निशमन दलाची चिंता वाढली आहे. अग्निशमन दलाने दिलेल्या सुरक्षाविषयक सुचनांचं पालन दुकानदार करत नाहीत त्यामुळे आगीच्या घटना घडतात असं निरिक्षण अग्निशमन दलाने नोंदवलं आहे. (सविस्तर वृत्त लवकरच)

First published: December 27, 2019, 5:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading