Home /News /mumbai /

Mumbai Fire VIDEO: मुंबईतील ताडदेव परिसरात बहुमजली कमला इमारतीला भीषण आग, 6 जणांचा मृत्यू

Mumbai Fire VIDEO: मुंबईतील ताडदेव परिसरात बहुमजली कमला इमारतीला भीषण आग, 6 जणांचा मृत्यू

Mumbai Fire:मुंबईतील ताडदेवमध्ये बहुमजली इमारतीला भीषण आग

Mumbai Fire:मुंबईतील ताडदेवमध्ये बहुमजली इमारतीला भीषण आग

Mumbai building fire live updates: मुंबईतील ताडदेव परिसरात इमारतीला भीषण आग लागली आहे. 20 मजली बहुमजली इमारतीला ही आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत.

मुंबई, 22 जानेवारी : मुंबईतील ताडदेव परिसरात इमारतीला भीषण (Mumbai building fire) आग लागली आहे. ताडदेव परिसरात असलेल्या कमला या इमारतीला ही आग (Kamala Building fire) लागली आहे. ही रहिवाशी इमारत असून 20 मजली इमारत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. इमारतीच्या 18व्या मजल्यावर ही आग लागली आहे. या आगीत 15 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शेजारील भाटीया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. (Fire break out in Mumbai Kamala residential building in Tardeo) आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि जवान घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या दाखल झाल्या असून अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आणि जवळपास दोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. ताडदेव परिसरात असलेल्या भाटीया रुग्णालयाच्या जवळील कमला या बहुमजली इमारतीला ही आग लागली होती. सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आगीचे लोट इमारतीच्या बाहेर स्पष्टपणे दिसत आहेत तसेच धूर ही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. इमारतीतील नागरिकांना घरातून बाहेर काढण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू करण्यात आले आहे. इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सुद्धा दाखल झाल्या आहेत. मुंबईत अग्नितांडवाच्या घटना सुरूच वन अविघ्न पार्क इमारतीत अग्नितांडव 22 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबईत इमारतीला भीषण आगलागली होती. लोअर परेल परिसरात रहिवासी इमारतीच्या 19व्या मजल्यावर भीषण आग लागली होती. लालबाग (Lalbaug) परिसरात असलेल्या वन अविघ्न पार्क इमारतीला आग (Fire at One Avighna Park) लागली होती. ही आग लागल्यानंतर एका इसमाने इमारतीवरुन बचावासाठी 19व्या मजल्यावरुन उडी घेतली असल्याचा एक भयंकर व्हिडीओ समोर आला होता. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र, इमारत उंच असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात अडचणी येत होत्या. वन अविघ्न पार्क ही 60 मजली इमारत असून तिच्या 19व्या मजल्यावर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. 12 नोव्हेंबरला मानुखुर्दमध्ये आग 12 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास मानखुर्दमध्ये भीषण आग लागली होती. या आगीत अंदाजे 10 ते 12 दुकान जाळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या आणि पाण्याचे बंब घटनास्थळी पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळवले. रात्री 3 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. अवघ्या काही क्षणातच गोदाम आगीच्या भक्षस्थानी पडले. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही. 17 सप्टेंबर रोजीही मानखुर्दमध्ये भीषण आग यापूर्वी 17 सप्टेंबर 2021 रोजीही पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मानखुर्द येथे भंगाराच्या गोदामाला आग (fire breaks out at scrapyard) लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. ही आग इतकी भीषण होती की आगीच्या मोठ मोठ्या ज्वाळा आणि धुराचे लोट लांब-लांबून दिसत होते. अग्निशमन दलाच्या 20 गाड्या दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. या भीषण आगीचे व्हिडीओ समोर आले होते. ते पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. शर्थीचे प्रयत्न करुन अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवले होते.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Mumbai

पुढील बातम्या