मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईत ऐन मध्यरात्री बर्निंग ट्रेनचा थरार; थरकाप उडवणारा VIDEO आला समोर

मुंबईत ऐन मध्यरात्री बर्निंग ट्रेनचा थरार; थरकाप उडवणारा VIDEO आला समोर

मुंबई सेंट्रलजवळ आगीचे लोळ AC Train बाहेर येतानाचा थरकाप उडवणारा VIDEO आता समोर आला आहे.

मुंबई सेंट्रलजवळ आगीचे लोळ AC Train बाहेर येतानाचा थरकाप उडवणारा VIDEO आता समोर आला आहे.

मुंबई सेंट्रलजवळ आगीचे लोळ AC Train बाहेर येतानाचा थरकाप उडवणारा VIDEO आता समोर आला आहे.

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी

मुंबई, 23 ऑक्टोबर : मुंबईत काल रात्री एका मॉलला भीषण आग लागली. सकाळपर्यंत ती आग विझवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडून होत होता. पण त्याच वेळी तिथून थोड्या अंतरावर असणाऱ्या मुंबई सेंट्रल स्थानकावरसुद्धा आगीचं तांडव सुरू झालं. सुदैवानं ही बर्निंग ट्रेन स्टेशनात उभी असताना आग लागली. धावत्या ट्रेनमध्ये हा प्रकार घडलेला नाही. त्यामुळे जीवितहानी झालेली नाही. पण आगीचे लोळ AC Train बाहेर येतानाचा थरकाप उडवणारा VIDEO आता समोर आला आहे.

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात पश्चिम रेल्वेची कारशेड आहे. इथे उभ्या असलेल्या एका एसी लोकल ट्रेनला ही आग लागली. रात्री दीडच्या सुमारास आगीचा भडका उडाला. एसी लोकलच्या पॉवर कोचलाच आग लागल्याने झटक्यात आग भडकली. तातडीने उपाययोजना सुरू करून आग आटोक्यात आणल्याने कारशेडमध्ये आग पसरली नाही आणि मोठी दुर्घटना थोडक्यात टळली.

स्टेनशनवर उपस्थित कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे ही आग वेळीच आटोक्यात येऊ शकली. लोकल ट्रेनच्या प्रवासी डब्यांना आग लागली नाही. मोठी हानी न होता आग विझवण्यात आली.

दरम्यान मुंबईच्या कुर्ला भागातल्या एका मॉलला रात्री 9 च्या सुमारास आग लागली होती. सिटी सेंटर या प्रसिद्ध मॉलला लागलेली ही आग सुमारे 10 तास धुमसत होती. रात्री मॉलमधील दुसऱ्या मजल्यावर मोबाईलच्या दुकानाला लागलेली आग भडकली आणि आगीचे लोळ उठले. या आगीमुळे कोट्यवधींचं नुकसान झालं आहे.

संपूर्ण मॉल आगीच्या भक्ष्यस्थानी आला आहे. त्यामुळे अग्निशमन दलाकडून ब्रिगेड कॉल आला असून गेल्या 10 तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न होते.

First published:

Tags: Fire, Mumbai