मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

10 तासांपासून जळतोय मुंबईतील प्रसिद्ध मॉल, पाहा 5 थरारक VIDEO

10 तासांपासून जळतोय मुंबईतील प्रसिद्ध मॉल, पाहा 5 थरारक VIDEO

मॉलमधील दुसऱ्या मजल्यावर मोबाईलच्या दुकानाला लागलेली आग भडकलं आणि आगीचे लोळ उठले.

मॉलमधील दुसऱ्या मजल्यावर मोबाईलच्या दुकानाला लागलेली आग भडकलं आणि आगीचे लोळ उठले.

मॉलमधील दुसऱ्या मजल्यावर मोबाईलच्या दुकानाला लागलेली आग भडकलं आणि आगीचे लोळ उठले.

  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई, 23 ऑक्टोबर : नवरात्र उत्सवाचा आनंद आणि अनलॉक 5 च्या टप्प्यात सुरू झालेल्या मॉलमध्ये भीषण अग्नितांडव झाला आहे. जवळपास 10 तासांपासून ही आग धुमसत आहे. एका मोबाईलच्या दुकानाला लागलेली आग भडकली आणि ती मॉलमध्ये पसरल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी रात्री उशिरा ही आग लागली. रात्री उशिरा आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

मुंबईतील सिटी सेंटर या प्रसिद्ध मॉलमध्ये ही आग लागली. रात्री मॉलमधील दुसऱ्या मजल्यावर मोबाईलच्या दुकानाला लागलेली आग भडकली आणि आगीचे लोळ उठले. या आगीमुळे कोटींचं नुकसान झालं आहे. संपूर्ण मॉल आगीच्या भक्ष्यस्थानी आला आहे. त्यामुळे अग्निशमन दलाकडून ब्रिगेड कॉल आला असून गेल्या 10 तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

हे वाचा-Mumbai Local train: आता खाजगी सुरक्षा रक्षकांनाही प्रवासाची मुभा

आग विझवताना अग्निशमन दलाचा एक कर्मचारी रमेश चौगुले किरकोळ जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ऑर्किड टॉवर या जवळच्या इमारतीमधून साधारण 3500 रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. आगीमुळे परिसरात धुराचे लोळ पसरले आहेत. गुरुवारी रात्री 9 वाजल्यापासून मुंबई सेंट्रल, भायखळा, क्लॉसिक रोड, नागपाडा येथील सिटी सेंट्रल मॉलमध्ये ही आग भडकली आहे. 10 तास उलटूनही या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळू शकलं नाही.

First published:

Tags: Mumbai, Mumbai police