Home /News /mumbai /

चेंबूर रेल्वे स्थानकाजवळ अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी

चेंबूर रेल्वे स्थानकाजवळ अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू असून इथे कोणी अडकलेल्याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

मुंबई, 01 ऑक्टोबर: कोरोना अनलॉक 05 चा टप्पा सुरू होत असतानाच मुंबईच्या चेंबुर रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना घडली आहे. चेंबूर रेल्वे स्थानक परिसरातील बाजारपेठेत मोठा अग्नितांडव झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीमुळे परिसरात धुराळे मोठ्या प्रमाणात लोळ उठल्याचं पाहायला मिळालं. रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या मोठ्या बाजारपेठेतील काही दुकानांमध्ये ही आग भडकल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आगीची माहिती मिळताच तातडीनं अग्निशमन दलाच्या गाड्या आणि वॉटर टँक घटनास्थळी पोहोचले. दरम्यान सध्या या परिसरात आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू असून इथे कोणी अडकलेल्याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. परिसरात मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाळा आणि धूर दिसत असल्यानं नागरिकांमध्ये देखील खळबळ उडाली आहे. हे वाचा-मृत्यूने क्षणात घेतली झडप, दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव गुरुवारी सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास चेंबूर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या जनता बाजारपेठेतील एका झेरॉक्सच्या दुकानाला आग लागली. झेरॉक्सच्या दुकानाला लागलेल्या आगीनं रौद्र रुप धारण करत आजूबाजूची तीन दुकानंही आपल्या भक्ष्यस्थानी केली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दहा गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं असून सध्या कुलिंग ऑपरेशनचं काम सुरू आहे. आधी झेरॉक्स च्या दुकानाला लागलेली आग पसरत बाजूच्या 4 दुकानापर्यंत पोहचली अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवेपर्यंत 4 ते 5 दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून ती जाळून खाक झाली. जनता मार्केटमध्ये जवळपास 100 च्या आसपास झेरोझ, स्टेशनरीची दुकान आहेत .लोकांची मोठी गर्दी असते पण सकाळ असल्याने दुकान बंद होती. पहाटेची वेळ असल्यानं दुकानं बंद होती आणि त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र आगीचं कारण समजू शकलं नाही.
Published by:Kranti Kanetkar
First published:

Tags: Mumbai

पुढील बातम्या