संशयाचा धूर! दादरमधल्या पोलीस वसाहतीत आग, 15 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

संशयाचा धूर! दादरमधल्या पोलीस वसाहतीत आग, 15 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

आग दुर्घटनेत श्रावणी चव्हाणचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमागे संशयाचा धूर येत आहे. कारण श्रावणीनं आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

  • Share this:

मुंबई, 12 मे : दादर येथील पश्चिमेला असलेल्या पोलीस वसाहतीमधील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली आहे. या दुर्घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाच क्रमांकाच्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलानं अथक परिश्रम करत आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र यामध्ये श्रावणी अशोक चव्हाण हिचा (वय 15 वर्ष) मृत्यू झाला आहे. दरम्यान, श्रावणीनं आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस तिचे आई-वडील एका लग्नसोहळ्यासाठी गेले होते. श्रावणीच्या घराला बाहेरून कुलूपदेखील लावण्यात आलेले होतं. त्यामुळे ही केवळ दुर्घटना होती की श्रावणीनं आत्महत्या केली? याबाबतची अधिकृत माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

वाचा अन्य बातम्या

ट्रक-कारचा भीषण अपघात; तीन जागीच ठार तर एक गंभीर

शेगावात एकाची दगडाने ठेचून हत्या, मृत युवक खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी

SPECIAL REPORT: रायगड: राज ठाकरे इफेक्ट शिवसेना खासदाराला हॅट्रीकपासून रोखणार का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2019 03:16 PM IST

ताज्या बातम्या