मुंबई, 17 ऑगस्ट : मुंबईतील प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केटमध्ये आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अब्दुल रहमान स्ट्रीट वर ही आग लागल्याची माहिती आहे. तसंच या आगीमुळे काही दुकानांचं नुकसान झालं आहे.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले गेले आणि काही वेळानंतर आग विझवण्यात यश आलं. सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
Mumbai: Fire breaks out at Crawford Market. 8 fire tenders present at the spot. Fire-fighting operation underway. More details awaited
— ANI (@ANI) August 17, 2020
दरम्यान, याआधी जून महिन्यातही या परिसरात आग लागली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.