मुंबईतील शॉपिंग सेंटरमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी

मुंबईतील शॉपिंग सेंटरमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी

इमारतीच्या ग्राउंड प्लोअरवर आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जुलै: कोरोनाच्या महासंकटात बोरीवली परिसरात पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली आहे. साखर झोपेत असताना अचनाक इंदिराप्रस्थ शॉपिंग सेंटरमध्ये आग लागली. पाहता पाहता रौद्र रुप धारण करण संपूर्ण शॉपिंग सेंटर आगीच्या भक्ष्यस्थानी गेलं. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. लेवल-2 आग असल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

इमारतीच्या ग्राउंड प्लोअरवर आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही आग पसरत गेली आणि भडका उडाला. दरम्यान आगीमुळे परिसरात धुराचे लोळ उडाले आहेत. स्थानिकांनी आगीची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर सकाळी 6 वाजता सुरुवातील 4 गाड्या आणि नंतर 13 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्याचं काम सुरू आहे.

हे वाचा-कोरोनाला रोखणाऱ्या धारावी मॉडेलची जगभरात चर्चा; WHO च्या अधिकाऱ्यांनी केलं कौतुक

शॉपिंग सेंटर बंद असल्यानं अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण समजू शकलं नाही मात्र आगीत शॉपिंग सेंटरमधील सामानचं मोठं नुकसान झालं आहे. याआधी 1 जुलै रोजी मुंबईच्या पवई परिसरातील हिरानंदानी गार्डनमधील सात मजली व्यावसायिक इमारतीत आग लागली होती. सकाळी 6.15 च्या सुमारास ही आग लागली होती.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 11, 2020, 7:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading