VIDEO : मुंबईतील रहिवासी इमारतीत भडकली आग, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील ड्रीमलँड सिनेमाजवळील एका रहिवासी इमारतीला रविवारी सकाळी (13 ऑक्टोबर) आग लागली.

News18 Lokmat | Updated On: Oct 13, 2019 11:04 AM IST

VIDEO : मुंबईतील रहिवासी इमारतीत भडकली आग, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

मुंबई, 13 ऑक्टोबर : मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील ड्रीमलँड सिनेमाजवळील एका रहिवासी इमारतीला रविवारी सकाळी (13 ऑक्टोबर) आग लागली. शांतिनिकेतन असे इमारतीचे नाव आहे. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास इमारतीत अग्नितांडव घडलं. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं घटनास्थळ गाठत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं कार्य सुरू केलं. आदित्य आर्केड टोपीवाला लेन परिसरातील ही घटना आहे. जवळपास तासाभराच्या बचावकार्यादरम्यान आठ जणांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात आलं. या घटनेत तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवानं या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

(वाचा : PM नरेंद्र मोदींच्या भाचीला भरदिवसा चोरट्यांनी लुटलं, बाईकस्वारांचा PHOTO VIRAL)

Loading...

दरम्यान, आग नेमक्या कोणत्या कारणांमुळे भडकली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

(वाचा : बहिणींनी आईची हत्या करून मृतदेह फेकला तलावात, गावकऱ्यांनी दिला चोप)

मुंबईच्या चर्नीरोडमध्ये रहिवासी इमारतीमध्ये अग्नितांडव, आगीचा भीषण LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 09:06 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...